Posts

Showing posts from July 5, 2024

आखाड सासरा... ॲड. रोहित एरंडे. ©

दरवर्षी आषाढ महिना सुरू झाला की मला मराठी भाषेतील मजेशीर म्हणी आठवतात.  तर आज पासून आषाढ( आखाड) महिना सुरू झाला आहे. आषाढ महिन्यात नवीन सुनेने सासू सासऱ्यांचे तोंड बघायचे नसते ह्या आशयाच्या मजेशीर म्हणी आहेत, त्याची  माहिती घेवू. अर्थात  अनेकांना माहिती असेलच. "आषाढ सासरा : लग्न झाल्यानंतर नव्या सुनेनें सख्ख्या सासर्‍याचें पहिल्‍या आषाढांत तोंड पाहावयाचें नसते म्हणून ती काही दिवस माहेरी किंवा दुसरीकडे जाते, तेव्हा  तेथला कोणी दुसरा माणूस सासर्‍याप्रमाणेंच तिला बोलू लागला की त्याला आषाढ सासरा म्हणतात. "खरी सासू धरती कान, तर आखाड सासू मागती मान" - खरी सासू केवळ कानच पकडेल, पण आषाढ सासू कानही पकडेल आणि त्याच बरोबर खोट्या मानपानाची अपेक्षाही ठेवेल.. दोघांचा अर्थ, थोडक्यात, दुसऱ्यावर विनाकारण हुकूमत गाजविणारा. मराठी भाषेत अश्या अनेक म्हणी  आहेत, ज्याची माहिती   आपल्याला असल्यास दुसऱ्यांना करून देण्याचा प्रयत्न करावा. ह्या म्हणींमधील गर्भितार्थ लक्षात घेणे गरजेचे आहे. धन्यवाद 🙏 ॲड. रोहित एरंडे. ©