पाणी गळती - सोसायटीचे उत्तरदायित्व काय ? - ऍड. रोहित एरंडे ©
आमच्या सोसायटीमध्ये चौथ्या मजल्यावरच्या फ्लॅटच्या मालकाच्या हातून चुकून पाण्याचा नळ चालू राहिला त्यामुळे तिसऱ्या मजल्यावर व्यक्तीच्या फ्लॅटमध्ये पाणी गळती होऊन फर्निचर इ. चे खूप नुकसान झाले आहे. तिसऱ्या मजल्यावर फ्लॅटच्या मालकाचं असं म्हणणं आहे की, तुम्ही त्यांना नोटीस काढा आणि आमचं नुकसान भरून द्या आज त्यांनी तक्रारी अर्ज सुद्धा सोसायटीमध्ये दिलेला आहे याबाबतीत सोसायटी काय करू शकते किंवा सोसायटीला कोणते अधिकार कायद्यानुसार प्राप्त आहेत. कृपया आपण मार्गदर्शन करावे ही विनंती श्री. अविनाश बवरे, चेअरमन कासा ब्लांका को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी, पुणे. आपल्या सारखे प्रश्न अनेक सोसायट्यांमध्ये येत असतात. तरी याबद्दलची कायदेशीर माहिती थोडक्यात बघू या. खर्चाला सोसायटी कधी जबाबदार ? सोसायटीच्या दुरुस्त उपविधी १५९ प्रमाणे सर्व प्रकारच्या पाण्याच्या गळत्या ज्यामध्ये पावसाच्या होणाऱ्या गळत्या आणि बाहेरील सामायिक पाईप तसेच मलनिःस्सारण वाहिनीमधून होणाऱ्या गळत्या याचा खर्च तसेच पावसामुळे गच्चीमधून होणाऱ्या गळतीमुळे टॉप फ्लॉवर फ्लॅट...