महिलांच्या मिळकतीमध्ये वाटेकरी कोण ? ॲड. रोहित एरंडे. ©
महिलांच्या मिळकतीमध्ये वाटेकरी कोण ? ॲड. रोहित एरंडे. © माझ्या पत्नीच्या एकट्याच्या नावावर एक फ्लॅट आहे आणि दुसरा फ्लॅट तिच्या आणि माझ्या नावावर आहे. माझी पत्नी २ वर्षांपूर्वी गेली. तिचे इच्छापत्र नाही .. तर हे दोन्ही फ्लॅट मी पती या नात्याने मला एकट्यालाच मिळतील ना ? त्यामध्ये माझ्या मुला -मुलीचा आणि सून -जावयाचा काही हक्क येतो का ? एक वाचक, मुंबई हिंदू पुरुष आणि महिला यांच्याबाबत वारसा हक्काचे नियम वेग-वेगळे आहेत, तरीही पती नंतर फक्त पत्नीलाच आणि पत्नी नंतर फक्त पतीलाच एकमेकांची मिळकत मिळेल, असा कायदा नाही. असो. या निमित्ताने परत एकदा या विषयाची थोडक्यात माहिती घेऊ. हिंदू वारसा कायदा कलम १४ अन्वये महिलांना एखादी स्थावर / जंगम मिळकत वारसाने, वाटपाने, पोटगीसाठी किंवा पोटगीच्या फरकापोटी, मृत्यूपत्र किंवा बक्षीसपत्र किंवा खरेदीखत अश्या दस्तांनी, स्त्री-धनापोटी इ. प्रकारे आणि कोणाकडूनही मिळाल्यास ती महिला अश्या मिळकतींची संपूर्ण मालक होते. ह्याला अपवाद म्हणजे अश्या दस्...