'सभासदांचे तारतम्य' हा रिडेव्हलपमेंटचा गाभा. : ॲड. रोहित एरंडे ©
'सभासदांचे तारतम्य' हा रिडेव्हलपमेंटचा गाभा. : ॲड. रोहित एरंडे © आमच्या २० सभासदांच्या सोसायटी मध्येही रिडेव्हलपमेंटचे वारे व्हायला लागले आहे. कारण आजूबाजूच्या सोसायट्यांचे काम सुरूही झाले आहे. आमची बिल्डिंग २५ वर्षे जुनी आहे. मात्र आमच्याकडे २ गट पडले आहेत. एका गटाला वाटते कि ७ मजल्याच्या वर बिल्डिंग होऊ नये भले जास्त वाढीव जागा नाही मिळाली तरी चालेल , तर दुसऱ्या गटाला वाटते कि पूर्ण FSI वापरून फ्लॅटला फ्लॅट मिळणार असेल तर कितीही मजली बिल्डिंग झाली तरी बेहतर, त्यातच काही सभासदांच्या मते प्रॉपर्टी कार्डवर नाव लावणे, सभासदांची अंतर्गत वाद सोडवणे हे बिल्डरनीच करायला हवे आहे आणि सोयी-सुविधांची मागणी तर संपतच नाही. तर यातून कसा मार्ग काढावा ? काही सभासद, पुणे. पुण्यासारख्या ठिकाणी रिडेव्हलपमेंटचे वारे, काय मी तर वादळच म्हणेन, जोरात व्हायला लागले आहेत ह्यात काही शंका नाही. एक कायदेशीर तत्व लक्षात घ्यावे, एखादी गोष्ट कायद्याने करावीच...