बक्षीसपत्र वैध होण्यासाठी .. - ऍड. रोहित एरंडे ©
माझा फ्लॅट मी नोटरी केलेल्या बक्षीस पत्राद्वारे माझ्या मुलाच्या नावे केला आहे. मात्र सोसायटी या नोटरी -बक्षीसपत्राला मानायला तयार नाही आणि कोर्टातून ते सिध्द करून आणण्यास सांगत आहे आणि तो पर्यंत मुलाला सभासदत्व देण्यास नकार देत आहे. तर या बाबतीतला कायदा काय आहे ? एक वाचक, पुणे. कुठल्याही २ किंवा अधिक व्यक्तींच्या 'हयातीमध्ये' एखाद्या स्थावर मिळकतीमधील मालकी हक्क हा खरेदीखत, हक्कसोड पत्र, वाटप-पत्र किंवा बक्षीसपत्र यांसारख्या 'नोंदणीकृत' दस्तानेच तबदील केला जाऊ शकतो,केवळ नोटरी केलेल्या दस्ताने नव्हे . तर आपल्या प्रश्नाच्या अनुषंगाने बक्षीसपत्राबद्दलच्या (Gift Deed ) कायदेशीर तरतुदी थोडक्यात अभ्यासू. १. स्वतःच्या मालकिची आणि 'अस्तित्वात' (existing) असलेली स्थावर किंवा जंगम मिळकत बक्षिस पत्राने तबदील म्हणजेच ट्रान्सफर करता येते. जो मिळकत लिहून देतो त्यास डोनर असे म्हणतात आणि ज्याला मिळते त्याला डोनी म्हणतात. थोडक्यात जी गोष्ट अस्तित्वात नाही तिचे बक्षीसपत्र करता येत नाही. संपूर्ण मिळ...