पुनर्विकास : नवीन फ्लॅट कुठल्या मजल्यावर मिळावा ? ऍड. रोहित एरंडे
पुनर्विकास : नवीन फ्लॅट कुठल्या मजल्यावर मिळावा ? आमच्या ४० सभासदांच्या सोसायटीमध्ये २ बीएचके आणि ३ बीएचके असे वेगवेगळे फ्लॅट आहेत. आता रिडेव्हलपमेंटसाठी बिल्डरची नेमणूक झाली आहे. नवी इमारतीमध्ये काही सभासदांनी जादा एरिया विकत घेण्याची तयारी दाखविली आहे तर काहींचा अजून विचार चालू आहे. या सर्व बाजूंचा विचार करून बिल्डरने ३-४ प्रकारच्या फ्लॅटचे डिजाईन दिले. सर्व सूचनांचा अनेकवेळा विचार करून विशेष सभेमध्ये Allotment फायनल करून घेतली. यामध्ये ४-५ महिने गेले आहेत. मात्र आता एक ग्रीडचे सभासद Allotment मान्य नाही असे म्हणत आहेत आणि रोख आमच्यावर आहे. आता बिल्डर देखील डिझाईन बदलता येणार नाही असे म्हणत आहे. तरी या बाबत कसा मार्ग काढावा ? कायदा काय सांगतो ? त्रस्त मॅनेजिंग कमिटी सदस्य, पुणे "लग्न पाहावे करून आणि घर पाहावे बांधून" यासारखी आता रिडेव्हलपमेंट म्हणजेच पुनर्विकास पाहावे करून अशी नवीन म्हण तयार करता येईल. कारण पुनर्विकास प्रक्रिया सुर...