पत्नीच्या मिळकतीचे वारस कोण ? ॲड. रोहित एरंडे. ©
पत्नीच्या मिळकतीचे वारस कोण ? ॲड. रोहित एरंडे. © सर, तुमचे आणि म.टा. चे विशेष आभार. या लेखमालेमुळे अनेक शंका घरबसल्या सुटायला मदत होते. मागच्या आठवड्यातील तुमच्या लेखाला अनुसरून प्रश्न विचारतो की समजा पत्नी आधी मयत झाली तर तिच्या नावावर असलेली मिळकत पतीलाच मिळते की तिच्या मुलाबाळांचा आणि माहेरच्या लोकांचा काही हक्क असतो ?. एक वाचक पुणे. सर्वप्रथम आपले आभार की आमच्या लेखमालेमुळे लोकांना त्यांचे कायदेशीर प्रश्न सुटायला मदत होत आहे हे वाचून संतोष वाटला. असो. आता याबाबत कायदेशिर तरतुदी का आहेत यांचा थोडक्यात आढावा घेऊ. स्त्रिया मिळकतीच्या पूर्ण मालक ! हिंदू वारसा कायद्याच्या कलम १४ अन्वये स्त्रियांना एखादी स्थावर / जंगम मिळकत वारसाने, वाटपाने, पोटगीसाठी किंवा पोटगीच्या फरकापोटी, मृत्यूपत्र किंवा बक्षीसपत्र किंवा खरेदीखात अश्या दस्तांनी, स्त्रीधनापोटी इ. प्रकारे आणि कोणाकडूनही मिळाल्यास ती स्त्री अश्या मिळकतींची संपुर्ण मालक होते. ह्याला अपवाद म्हणजे अश्या दस्तांनी जर मिळकतींमध्ये फक्त तहहयात राहण्याचा हक्क (life interest ) दिला असेल तर त्यामध्ये असा मालकी हक्क मिळत नाही. आता तुम...