ग्राहकाचे खरेदीखत हरविल्याबद्दल बँकेला ५ लाख रुपयांचा दंड ! ऍड. रोहित एरंडे.©
ग्राहकाचे खरेदीखत हरविल्याबद्दल बँकेला ५ लाख रुपयांचा दंड ! ऍड. रोहित एरंडे.© कर्ज मिळवण्यासाठी काय काय करावे लागते, किती कागदपत्रे गोळा करावी लागत आणि ती बँकेत द्यावी लागतात ह्यावरून 'कर्ज पहावे घेऊन' हे का म्हटले आहे ते कळेल. तर कर्जाची मंजूर झालेली रक्कम अदा करताना बँक त्या जागेचे मालकी हक्काची मूळ (original )कागदपत्रे म्हणजेच खरेदीखत, ताबे पावती, फ्लॅट रिसेल चा असेल, तर पूर्वीच्या मालकाची खरेदीखत , साठे खत इ. सर्व अस्सल कागदपत्रे आपल्या ताब्यात तारण म्हणून ठेवून घेते आणि त्याची पोच कर्जदाराला देते (अशी पोच घेणे खूप महत्वाचे असते) आणि हि कागदपत्रे कर्ज फेडल्यावर सुस्थितीत परत देण्याची जबाबदारी बँकेवर असते. बहुतेक बँकांची अशी कागदपत्रे ठेवण्यासाठी वेगळे विभाग असतात. परंतु अशी कागदपत्रे बँकेतून गहाळ झाली तर बँकेचे दायीत्व काय ? या प्रश्नावर राष्ट्रीय ग्राहक आयोगाने एका याचिकेवर नुकताच १९ ऑगस्ट २०२४ रोजी निकाल देताना " खातेदारांची कागदपत्रे हरविणे हि गंभीर बाब असून सेवेमधील मोठी त्रुटी आहे"...