प्राणीप्रेम कायद्यापेक्षा मोठे नाही. ॲड. रोहित एरंडे ©
प्राणीप्रेम कायद्यापेक्षा मोठे होऊ शकत नाही. ॲड. रोहित एरंडे © प्रश्न : आमच्या सोसायटीमध्ये आम्ही ज्या फ्लॅट मध्ये राहतो त्याच्या राहणाऱ्या एका सभासदाने त्याच्या खिडकीमध्ये कबुतरांना दाणा -पाणी देण्यासाठी , एक ट्रे बसवला आहे. त्यामुळे आमच्या गच्चीमध्ये कबुतरांची घाण, पिसे, दाणे असा कचरा होतो. या सभासदांना हा प्रकार थांबविण्यास सांगितला तर ते म्हणतात, हे पुण्याचे काम आहे. दुसऱ्या सभासदाने घरातच २ कुत्रे पाळले आहेत, जे सारखे भुंकत असतात आणि त्याचे मालक त्यांचे अतोनात लाड करतात आणि या प्रेमापोटी जिन्ह्यात केलेली घाण सुध्दा ते नीट साफ करत नाहीत त्यामुले सतत एकप्रकारचा नकोसा वास येत असतो. . सोसायटी पदाधिकारी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहेत. या सर्वाचा आम्हाला आणि इतर सभासदांनाही खूप त्रास होत आहे तरी या बाबत कृपया मार्गर्दशन करावे.. एक वाचक पुणे. पु.ल. ज्यांना "पाळंदे" असे मजेने संबोधायचे असे प्राणी पाळणारे मोजके लोक आणि इतर सभासद यांच्यामध्ये वादावादी होतेच. सर्व प्रथम त्या सभासद महाशयां...