"पुनर्विकास करार आणि करमुक्त रकमा.. " ॲड. रोहित एरंडे ©
"पुनर्विकासादरम्यान सभासदांना मिळणाऱ्या कोणत्या रकमा करमुक्त ?" ॲड. रोहित एरंडे © आमच्या सोसायटीची रिडेव्हलपमेंट प्रक्रिया सुरु झाली आहे. विकसनकराराचा मसुदा वकीलांकडून तपासावा का ? आम्हाला बिल्डर ज्या रकमा देणार आहे, त्या रकमा करमुक्त आहेत का ? या बद्दल उलटसुलट चर्चा चालू आहेत. याबाबत कृपया मार्गदर्शन करावे. एक वाचक, पुणे विकसन करारनामा अत्यंत महत्त्वाचा : पुनर्विकासामधील डेव्हलपमेंट ऍग्रिमेंट -विकसन करारनामा आणि सोबत येणारे कुलमुखत्यारपत्र हे अत्यंत महत्वाचे दस्तऐवज आहेतच. अशा करारनाम्यामधील अटी किती महत्वाच्या असतात आणि त्यासाठी सोसायटीने स्वतःचे वकील, सी. ए, आर्किटेक्ट अश्या तज्ञ व्यक्तींची नेमणूक करणे किती महत्वाचे आहे याकडे पुढील निकाल निर्देश करतो. या करारनाम्यामध्ये बिल्डर आणि सभासद यांचे हक्क- अधिकार लिहिले जातात, जे बिल्डर आणि सोसायटी -सभासद यांच्यावर बंधनकारक असतात. तसेच करारनामा...