दुष्टचक्रात गुरफटत चाललेले 'डॉक्टर-पेशंट' चाललेले नाते ॲड. रोहित एरंडे ©
दुष्टचक्रात गुरफटत चाललेले 'डॉक्टर-पेशंट' चाललेले नाते ॲड. रोहित एरंडे © पुण्यातील प्रसिध्द दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मधील झालेल्या प्रकरणानंतर जागेवर आणि समाजमाध्यमांवर प्रतिक्रियांचा खच पडला आणि अनेकांनी आपली पोळी भरून घेण्याचा प्रयत्न केला. सध्या तर ब्रेकिंग न्यूज आणि मिडिया ट्रायलच्या जमान्यात पुढची ब्रेकिंग न्यूज येईपर्यंत दोन चार दिवस विषय तापवत ठेवला जातो. पुढे त्या गोष्टींमधील सत्य चौकशीअंती बाहेर आले कि नाही याची कोणीच दखल घेत नाही. याही केसमध्ये यथावकाश चौकशी समिती, ग्राहक मंच येथे साक्षी पुरावे, कायदा यांना अनुसरून तथ्य पुढे येईलच आणि दोषींवर कायद्याप्रमाणे कडक कारवाई व्हायलाच पाहिजे. मात्र या सर्व प्रकरणामुळे आपली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था किती सक्षम पाहिजे हेही अधोरेखित झाले. आजही आपल्याकडे सुमारे ३८% टक्के लोकांकडेच आरोग्य विम्याचे कवच आहे अशी आकडेवारी सांगते. परवडतील अश्या दरात वैद्यकीय उपचार मिळणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे आणि यासाठी सरकारी रुग्णालये तेवढ्या तोडीची बनविण्याची जबाबदारी हि सरकारवर ...