अविवाहित महिला आणि मिळकतीची विभागणी : ॲड. रोहित एरंडे ©
अविवाहित महिला आणि मिळकतीची विभागणी : नमस्ते , मी एक अविवाहित महिला आहे. मी आणि माझे आई-वडील आम्ही एकत्र सुखाने रहात आहोत. मी नोकरी करून पैश्यातून काही स्थावर जंगम प्रॉपर्टी कमावली आहे. माझे मृत्युनंतर माझी मिळकत कोणाला मिळेल ? मृत्युपत्र करणे कायद्याने मँडेटरी आहे का ? एक वाचक, हिंदू वारसा कायद्याप्रमाणे पुरुष आणि महिला यांच्या मिळकतीची त्यांच्या मृत्युपश्चात विभागणी वेगळ्या पद्धतीने होते. आपल्या प्रश्नाकडे वळण्यापूर्वी एक समजून घेऊ की एखाद्या मिळकतीमध्ये मालकी हक्क हा आपल्या हयातीमध्ये हवा असेल तर खरेदीखत, बक्षीसपत्र, हक्कसोड पत्र, वाटप-पत्र यांसारख्या नोंदणीकृत दस्तानेच दिला -घेतला जाऊ शकतो. तर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या मिळकतीमधील मालकी हक्क हा मृत्यूपत्राने (टेस्टमेंटरी सक्सेशन) किंवा मृत्यूपत्र केले नसेल तर वारसा हक्काने (इंटेस्टेट सक्सेशन ) तबदील होऊ शकतो. खरेदीखत, बक्षीसपत्र , मृत्युपत्र ह्यायोगे मिळालेली मिळकत हि त्या व्यक्तीची स्वकष्टार्जित / स्वतंत्र मिळकत धरली जाते. ...