Posts

Showing posts from March 2, 2025

"लाईफ इन्शुरन्स पॉलिसी धारकांना सर्वोच्च दिलासा" : ॲड. रोहित एरंडे ©

"लाईफ इन्शुरन्स पॉलिसी धारकांना सर्वोच्च दिलासा"   ॲड. रोहित एरंडे © लाईफ इन्शुरन्स पॉलिसी - जीवन विमा  याकडे बहुतांशी मध्यमवर्गीय लोक एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून बघत आले आहेत.    "योगक्षेमं वहाम्यहम्" हा भगवद्गीतेतील २२व्या अध्यायातील एक श्लोक आहे जो जीवन विमा क्षेत्रामधील अग्रणी असलेल्या एलआयसी चे ब्रीदवाक्य आहे. या श्लोकात भगवंत असे सांगतात  की, "जे लोक अढळ श्रद्धेने मला मनापासून शरण जातात त्यांच्या कल्याणाची आणि संरक्षणाची मी वैयक्तिकरित्या काळजी घेतो" तद्वत  जीवन विमा पॉलिसी घेतल्यावर पॉलिसी  करारानुसार, पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर किंवा निश्चित कालावधीनंतर विमा कंपनी पॉलिसीधारकाला किंवा त्याच्या  नामांकित लाभार्थ्यांना विम्याची रक्कम देते. या बदल्यात, पॉलिसीधारक विमा कंपनीला प्रीमियम भरतो. आता वेगवेगळ्या कंपन्या देखील या क्षेत्रात उतरल्या आहेत आई र्पत्येक व्यक्ती त्याच्या कुवतीनुसार वेगवेगळ्या कंपन्यांच्या पॉलिसी घेऊ शकतो. मात्र अशी पहिली पॉलिसी असताना त्याची माहिती दुसऱ्या कंपनीची पॉलिसी घेताना दिली गेली नाही, तर या कारणास्तव  पॉलि...