पार्किंग नियमावली ठरविण्याचे अधिकार जनरल बॉडीला - ॲड. रोहित एरंडे ©
पार्किंग नियमावली ठरविण्याचे अधिकार जनरल बॉडीला - ॲड. रोहित एरंडे © आमच्या सोसायटीमध्ये दोन विंग मध्ये १८ फ्लॅट + ३ दुकाने असून एकूण १८ सदस्यांपैकी १४ सदस्य त्यांच्या दुचाकी इथे पार्क करीत असत. २०११ मधील जनरल बॉडीच्या एका ठरावानुसार पार्किंग चार्जेस घेत होते. मात्र, पार्किंग योग्य नाही, गाड्यां सुरक्षा नाही म्हणून काही सदस्यांनी पार्किंग चार्जेस देणे बंद केले आणि मॅनेजिंग कमिटीने तसा ठराव २०२१ मध्ये पारित केला. बाकीचे सदस्य पार्किंग चार्जेस सुरु करून थकीत चार्जेस घ्या अशी मागणी करत आहेत, पण कमिटी काही दाद देत नाही. तर याबाबत काय करता येईल ? एक वाचक, नेरूळ, नवी मुंबई कितीही दिले तरी कमीच असे पार्किंग बद्दल बोलले जाते आणि सभासदांचे एकमेकांशी संबंध बिघडवण्यास पार्किंग निमित्त ठरल्याचे बरेचदा दिसून येते. बायलॉज (उपविधी) क्र. ७८-८४ प्रमाणे मोकळ्या जागेतील पार्किंगचे नियम ठरविण्याचे अधिकार जनरल बॉडीला आहेत, मॅनेजिंग कमिटीला नाहीत, पण जनरल बॉडीने केलेल्या नियमांची अंमलबजावणी करून घेणे हे कमिटीच्या अखत्यारीत येते....