Posts

Showing posts from April 9, 2025

दुकान असो वा फ्लॅट, सोसायटीमध्ये मासिक देखभालखर्च सर्वांना समान : ॲड. रोहित एरंडे ©

आमच्या    बिल्डिंगमध्ये खाली   ४ दुकाने   आणि बाकी  २५ फ्लॅट्स आहेत.  एक दुकानात मी माझा किराणा व्यवसाय सुरु  केला आहे. बाकी तिन्ही गाळे बंद आहेत. माझे दुकान बिल्डिंग बाहेरच्या बाजूला  असून रहिवासी बिल्डिंगचे  पार्किंग, लिफ्ट,दिवे, साफसफाई  इ. सेवा  मी  वापरत नाही.  फ्लॅटसाठी मासिक मेंटेनन्स  रु. ५००-/इतका आहे, पण मी दुकानदार आहे, मी त्यातून पैसे कमावतो सबब मी जास्त पैसे द्यायला पाहिजे म्हणून माझ्याकडून रु. ७००/- घेतात.   हे चुकीचे नाही का ?  या साठी कुठे दाद मागू शकतो?   एक वाचक, नाशिक  प्रत्येक सोसायटीमध्ये कळीचा मुद्दा असलेला मासिक देखभाल खर्च / सेवा-शुल्क (मेंटेनन्स)  किती असावा हे ठरविण्याचा अधिकार सोसायटीला नक्कीच आहे. मात्र तो देखभाल खर्च सर्वांना सामान असावा हे  कायदा सांगतो.  निवासी असो वा  व्यावसायिक, पहिल्या मजल्यावर राहताय  का  शेवटच्या मजल्यावर, फ्लॅट छोटा आहे का मोठा, त्यानुसार मेंटेनन्स कमी जास्त होत नाही.    या   ...