पुनर्विकास आणि ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न . ॲड. रोहित एरंडे ©
पुनर्विकास आणि ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न .. ॲड. रोहित एरंडे © आमच्या सोसायटीला सुमारे ४० वर्षे झाली आहेत. बिल्डिंग उत्तम आहे, काही ज्येष्ठ नागरिक वगळता बहुतांशी सभासदांना Redevelopment करायचे आहे. ज्येष्ठ नागरिकांना या वयात दुसरी जागा शोधणे आणि किती काळ पर्यायी जागेत रहावे लागेल आणि बिल्डरने फसवले किंवा प्रोजेक्ट फसले तर काय याचे टेन्शन येते. अश्या ज्येष्ठ सभासदांना तर Redevelopment केले आणि नाही केले याचे फायदे तोटे कसे समजावावेत ? असेच प्रश्न आमच्या मित्रांच्या सोसायटीमध्ये पण येत आहेत . एक वाचक, पुणे एकीकडे पुनर्विकास प्रक्रियेमध्ये तरुणांच्याही पुढे होऊन सगळी धावपळ करत असणारे ज्येष्ठ सभासद आणि दुसरीकडे तुमचा प्रश्न असे परस्पर विरोधी चित्र सध्या दिसून येते आअमुक इतकी वर्षे झाल्यावरच पुनर्विकास करता येतो किंवा करावाच असा काही कायदा नाही. प्रत्येक बिल्डिंगची स्थिती, सभासदांचे प्रश्न आणि त्याची तीव्रता देखील वेगवेगळी असते. तुमची सोसायटी असल्यामुळे...