हिंदू पुरुषाचे वारस कोण ? मृत्युपत्र केले नसेल तर वारसा हक्क कायदा लागू होईल.. ऍड. रोहित एरंडे.©
हिंदू पुरुषाचे वारस कोण ? मृत्युपत्र केले नसेल तर वारसा हक्क कायदा लागू होईल.. ऍड. रोहित एरंडे.© माझ्या पतीने त्यांच्या स्वकमाईतून एक फ्लॅट विकत घेतला होता त्या फ्लॅटमध्येच मी राहते. मागील वर्षी माझ्या पतीचे निधन झाले मात्र त्यांनी कोणतेही विल करून ठेवलेले नव्हते. आम्हाला मूल -बाळ नाही. आता हिंदू वारसा कायद्याप्रमाणे मी एकटीच माझ्या पतीची कायदेशीर वारस असल्याने तो फ्लॅट माझ्या एकटीच्या मालकीचा झालेला असतानाही आता अचानक आमच्याशी कुठलेही संबंध न ठेवलेले माझे दीर म्हणत आहेत कि त्यांच्या आईचा म्हणजेच माझ्या सासूबाईंचा देखील त्या फ्लॅटमध्ये हिस्सा आहे. तर माझ्या सासूबाईंना हिस्सा मिळेल का ? एक वाचक, पुणे. तुमच्यासारखे प्रश्न अनेकांना पडत असतील. आपल्या मृत्युनंतर आपले कायदेशीर वारस कोण होतात याची अनेकांना माहिती नसते आणि त्यामुळे असे प्रश्न निर्माण होतात. एखाद्या मिळकतीमध्ये मालकी हक्क हा व्यक्तींच्या हयातीमध्ये खरेदीखत, बक्षीसपत्र, हक्कसोड पत्र, वाटप-पत्र यांसारख्या नोंदणीकृत दस्तानेच तबदील केला जाऊ शकतो. तर ...