गाडी विकताय ? मग हे लक्षात ठेवाच... ऍड. रोहित एरंडे ©
गाडी विकताय ? मग हे लक्षात ठेवाच... ऍड. रोहित एरंडे © "सर, मला अजमेर, राजस्थान येथील कोर्टाची नोटीस आलीय आणि माझ्या विरुध्द ८६ लाख रुपयांचा दावा केलाय".. आमच्या स्वयंपाकाच्या मावशींचा मुलगा काकुळतीने येऊन सांगत होता.. कागद बघितल्यावर मी विचारले "अरे हि तर मोटार अपघात प्राधिकरणाची नोटीस आहे, कि तू गाडी कधी घेतलीस आणि आता विकलीस कधी ? ,, "सर, जरा शो म्हणून थर्ड हॅन्ड घेतली कशी तरी पण नंतर परवडेना म्हणून विकून टाकली".. मी विचारले" विकताना काही कागद केलेस का ? आरटीओ रेकॉर्डला तुझे नाव बदल्लेस का ? यावर अर्थातच उत्तर अपेक्षेप्रमाणे नाही आले... म्हटले तू ज्यांना गाडी विकलीय, त्यांनी ती परत कोणालातरी विकली आणि त्या दुसऱ्या गाडीवाल्याच्या हातून राजस्थान मध्ये अपघात झालाय त्यात १-२ माणसे गेलीत आणि त्याच्या नुकसान भरपाई करण्यासाठी त्यांनी दावा केला आहे आणि आरटीओ रेकॉर्डला गाडीच्या मालक सदरी अजूनही तुझेच नाव असल्यामुळे तुला नोटीस आली आहे !!" या प्रकरणामुळे परत एकदा गाडी विकताना किती सावधगिरी बाळगायला पाहिजे हे लक्षात आले आणि सुप्रीम कोर्...