Posts

Showing posts from August 12, 2024

मरावे, परी अवयवदानारूपी उरावे. ऍड. रोहित एरंडे.©

 मरावे, परी अवयवदानारूपी उरावे.  ऍड. रोहित एरंडे.© १३ ऑगस्ट हा जागतिक अवयवदान दिवस म्हणून साजरा केला जातो, तर २७ नोव्हेंबर हा दिवस भारतीय अवयवदान दिवस म्हणून साजरा केला जातो, त्या निमित्ताने.... असे  वाचनात आले कि दरवर्षी सुमारे ५ लाख लोक अवयवदान  न मिळाल्यामुळे, तर सुमारे  २ लाख लोक लिव्हरच्या आजारामुळे मरतात , तर सुमारे १,५०,००० लोक किडनी ट्रांसप्लांट साठी प्रतीक्षेत असतात आणि या उलट केवळ ५००० व्यक्तींनाच अवयवदानाचा लाभ होतो, एवढे व्यस्त प्रमाण मागणी आणि पुरवठ्यामध्ये आहे. त्याचप्रमाणे  भारतामध्ये रोज मरणाऱ्या व्यक्तींची संख्या बघता त्यांनी   जर का नेत्रदान केले, तर भारतामध्ये एकही अंध व्यक्ती उरणार नाही असेहि  म्हणतात.   मानवी अवयवांचे दान आणि प्रत्यारोपण नियमाप्रमाणे व्हावे,  मानवी अवयवांच्या  तस्करीला आळा बसावा, यासाठी १९९४ साली भारत सरकारने मानवी अवयव आणि पेशी प्रत्यारोपण कायदा अस्तित्वात आणला. तदनंतर वेळोवेळी वेगळी नियमावली देखील अंमलात आणली आहे. भारतात अवयवदानासाठी केंद्र सरकारने सदरील कायद्याखाली २०११ मध्ये आणलेल्या दुरुस्तीनुसार   स्थापन केलेली  नॅशनल ऑर्गन आणि टिश्यू ट्रान्स