सोसायटी वा अपार्टमेन्ट : आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही असे वर्तन असावे - ॲड. रोहित एरंडे
आमच्या वरच्या मजल्यावर एक सुशिक्षित कुटुंब राहते. त्यांच्या घरातून जोराचे आवाज सकाळ संध्याकाळ येत असतात. सकाळच्या वेळचे विचारले तर म्हणतात भाकऱ्या थापताना आवाज येणारच आणि संध्याकाळी सारखे फर्निचर इ. हलवत असतात. या सर्व प्रकारचा आम्हाला खालती खूप त्रास होतो. आम्ही जाब विचारल्यावर आमच्याच अंगावर येतात आणि वर परत माझे वडील मोठे सरकारी अधिकारी आहेत, आम्हाला काहीही होणार नाही अशी दुरुत्तरे करतात. सोसायटीकडे तक्रार करूनही काही उपयोग झाला नाही. तर आता यावर मार्ग काय ? एक त्रस्त कुटुंब. आपल्यापैकी अनेकांना वाचून आश्चर्य वाटेल, पण असे प्रश्न अनेक सभासदांना भेडसावत असतात आणि अश्या सततच्या आवाजामुळे आपल्या मानसिक शांततेवर विपरीत परिणाम होत असतो. आपल्या प्रश्नामुळे परत एकदा "सिव्हिक सेन्स" - नागरिकशास्त्र शिकणे हे शालेय पेपर मधील १० मार्कांपुरते मर्यादित नसून "आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही असे वर्तन असावे" हे तत्व सोसायटी असो व अपार्टमेन्ट सगळीकडे लागू होते आणि हे विद्यार्थी दशेपासून बिंबवले गे...