लिव्ह-इन रिलेशनशिप आणि फ्लॅटमधील हक्क : ॲड. रोहित एरंडे ©
लिव्ह-इन रिलेशनशिप आणि फ्लॅटमधील हक्क : गेले ४-५ वर्षे मी आणि माझा मित्र लिव्ह-इन रिलेशनशिप मध्ये एकत्र राहत आहोत आणि आम्हाला दोघांना मिळून एक फ्लॅट विकत घ्यायचा आहे. अजून आम्ही लग्नाचे ठरवले नाही. तसेच त्या बिल्डिंगचे रिडेव्हलपमेंटचे काम सुरु होणार आहे. त्यामुळे नवीन फ्लॅट देखील आमच्याच नावावर होईल काय ? मात्र भविष्यात आमच्यामध्ये काही वाद निर्माण झाल्यास आमच्या या फ्लॅटची मालकी याबद्दल काय करता येईल ? आमच्या पैकी एकाच्याच नावावर फ्लॅट हवा असेल तर काय करावे ? एक वाचक, मुंबई . लिव्ह-इन रिलेशनशिप हा प्रकार आता आपल्याकडे काही नवीन नाही. दोन सज्ञान भिन्नलिंगी पण अविवाहित व्यक्तींनी लग्नासारखे एकत्र राहणे म्हणजे लिव्ह-इन-रिलेशन असे व्याख्या हा विषय माहिती नसणाऱ्यांसाठी करता येईल. मात्र एखादी गोष्ट कोणाला अनैतिक वाटली तरी ती बेकायदेशीर असलेच असेही नाही. असो. आपल्या प्रश्नात अनेक उपप्रश्न आहेत, त्या सर्वांची थोडक्यात उत्तरे देणायचा प्रयत्न करतो. कायद्याने कुठलीही सज्ञान व्यक्ती आणि जिचे मान...