डॉक्टर वाचले तरच आपण वाचू, हे लोकांना कधी समजणार ? ऍड. रोहित एरंडे ©
डॉक्टर वाचले तरच आपण वाचू, हे लोकांना कधी समजणार ? ऍड. रोहित एरंडे © दिल्लीमधील कुप्रसिध्द निर्भया प्रकरणाप्रमाणेच कोलकात्यामधल्या आर. जी. कर मेडिकल कॉलेज रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून हत्या करण्यात आली.त्यानंतर या घटनेचा निषेध करण्यासाठी देशभरात आंदोलनं सुरू झाली आहेत. दुर्दैवाची बाब अशी या हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी डॉक्टरांचे जे विरोध प्रदर्शन चालू होते त्यामध्येच अचानक जमाव रुग्णालयात घुसला आणि अनियंत्रित जमावाने रुग्णालयात तोडफोड केली. इमर्जन्सी वॉर्डला लक्ष्य केलं आणि डॉक्टर्स, स्टाफला मारहाण केली. इतकेच नव्हे तर आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. आता यावरून राजकारण सुरु झाले आहे. पण यासर्वामध्ये डॉक्टरांची सुरक्षितता हा मुद्दा दरवर्षीप्रमाणेच ऐरणीवर आला आहे. कोरोना जागतिक महामारीमध्ये सरकार बरोबर सर्वात पुढे होऊन डॉक्टर आणि त्यांचे सहकारी जीवाचे रान करीत असताना देखील डॉक्टरांवर हल्ल्याचे प्रकार झाल्यामुले अखेर केंद्र सरकारला महामारी कायद्यामध्ये दुरुस्ती करावी लागली आणि कठोर शिक्षेची तरतूद करावी लागल...