Posts

Showing posts from April 1, 2025

सही करण्याआधी खात्री करा.." "नाते आणि व्यवहार ह्यात गल्लत नको.." ॲड. रोहित एरंडे. © #किस्सेकोर्टातले

 " सही करण्याआधी खात्री करा.." "नाते आणि व्यवहार ह्यात गल्लत नको.." ॲड. रोहित एरंडे. © #किस्सेकोर्टातले  कोर्टामध्ये लोकांचे मुखवटे गळून खरे चेहरे बरेचदा समोर येतात. "आपले" लोकं असे कसे वागू शकतात, ह्या प्रश्नावर बरेचदा उत्तर नसते आणि आपले "प्रेम" आडवे येते. असे गमतीने म्हणतात कि महिनाभर बदाम खाऊन जेवढी अक्कल येत नाही तेवढी  अक्कल एका विश्वासघातात येते ! एक दिवस एक  आजोबा आमच्या ऑफिस मध्ये आले. म्हणाले, "माझे वय ८५ आहे. मला २ मुले आणि २ मुली आहेत.  थोरली  मुलगी पुण्यात  राहते जी माझ्याकडे बघते, बाकीचे तिघे अमेरिकेत असतात. सगळे पैसेवाले आहेत आणि आपापल्या संसारी सुखी आहेत !.थोरल्या मुलीचा तर स्वतःचा बंगला देखील आहे" . मी म्हंटले , " वा, टाच वूड".. आजोबा म्हंटले -, जरा थांबा " मी एकटाच माझ्या फ्लॅटमध्ये राहतो. पण  थोरलीने  मला फसविले आहे असे मला वाटते आहे कारण  माझ्या फ्लॅटची  या वर्षीची  प्रॉपर्टी टॅक्सची पावती  पाहिल्यावर मला धक्काच बसला, कारण माझे जाऊन तीच नाव कसे काय आले ? मी तर रजिस्टर  विल करून ठेवले आहे आणि त्यामध...