पुनर्विकासाला विनाकारण विरोध : न्यायालयाकडून रु. ४.५० लाखांचा दंड. ; ऍड. रोहित एरंडे ©
पुनर्विकासाला विनाकारण विरोध : न्यायालयाकडून रु. ४.५० लाखांचा दंड. ऍड. रोहित एरंडे © आमच्या सोसायटीची पुनर्विकास प्रक्रिया सुरु झाली. विशेष सभेमध्ये डेव्हलपरची देखील बहुमताने निवड झाली आहे. परंतु ३० पैकी ३-४ सभासद प्रत्येक टप्प्यावर विरोध करताहेत. आम्ही ज्येष्ठ नागरिक आहोत, आमची मुले येथे नाहीत आणि आम्ही आत्ताच फर्निचरचे काम केले आहे अशी कारणे देऊन या सभासदांचा विरोध चालू आहे. त्यामुळे जरी बहुमत असले तरी पुनर्विकास प्रक्रिया सुकरपणे पार पडेल कि नाही याची शंका वाटते. बहुमतातील सभासदांची त्यामुळे अडवणूक होत आहे. अश्या सभासदांबाबत काही कायदेशीर कारवाई करता येईल का ? सोसायटी कमिटी सदस्य, पुणे पुनर्विकास (रिडेव्हलपमेंट) आणि विरोध या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अर्थात हा विषयच खूप मोठा असल्यामुळे आणि जुने घर पडून नवीन बांधायचे असल्यामुळे हा निर्णय पारदर्शकपणे आणि साधक बाधक विचार करून घ्यायचा असतो यात काही शंका नाही. बऱ्याचवेळा असे दिसून येते कि जुन्या इमारतीच्या डागडुजीवर खर्च करण्यापेक्षा रिडेव्हलपमेंट कर...