पाणीगळती : सोसायटी आणि सभासदांची जबाबदारी. ऍड. रोहित एरंडे ©
पाणीगळती : सोसायटी आणि सभासदांची जबाबदारी. आमच्या डोक्यावर रहात असलेल्या कुटुंबाने टॉयलेटची दुरुस्ती करून घेतली आणि तेव्हापासून आमच्या टॉयलेटमध्ये घाण पाण्याची गळती सतत सुरु झाली आहे आणि छत खूप खराब झाले आहे. सुरुवातीला तक्रार केल्यावर त्यांनी काहीतरी केले आणि थोडे दिवस गळती थांबली, परंतु आता परत जास्त त्रास सुरु झाला आहे आणिआता ते सभासद दुरुस्ती करण्यास तयार नाहीत. आम्ही याबाबतीत कसा आणि कोणाकडे न्याय मागणे उचित ठरेल. ज्येष्ठ नागरिक, डोंबिवली. "विना सहकार नाही उद्गार" हे तत्व प्रत्यक्षात सहकारी सोसायट्यांमध्ये किती अंमलात आणले जाते हा एक संशोधनाचा विषय होईल. नागरिक शास्त्राचे मूलभूत तत्व कि आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होऊ नये आणि झाल्यास तो निस्तरून द्यायची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आपल्यावर असते, हे सोसायटी / अपार्टमेन्ट, सगळीकडे लागू होते. पण लक्षात कोण घेतो ? सोसायटीची जबाबदारी - खर्चाला फ्लॅटधारक कधी जबाबदार ? उपविधी ६८ (ब) आणि १५९ (ब ) मध्ये स्पष्टपणे हे नमूद के...