Et tu, Brute? - "also you, Brutus?", ब्रुटस यू टू ? ॲड. रोहित एरंडे ©

 Et tu, Brute?  - "also you, Brutus?", ब्रुटस यू टू ?

ॲड. रोहित एरंडे ©

जवळच्याच व्यक्तींनी विश्वासघात करण्याची  परंपरा पुरातन असल्याचे दिसून येईल. आपल्यापैकी अनेकांनी त्याचा अनुभव घेतला असेल आणि जवळच्या व्यक्तीने विश्वासघात केल्यावर ते व्रण कायम राहतात आणि त्याही पेक्षा   दुःख जास्त होते आणि मग राग येतो.. 

तर अशा विश्वासघातकी व्यक्तींसाठी "Et tu, Brute?  - "also you, Brutus?", ब्रुटस यू टू ?" — ही उपमा नेहमी दिली जाते.

ज्यांना या उद्गारमागची पार्श्वभूमी कदाचित माहिती नाही, त्यांच्यासाठी हा प्रसंग थोडक्यात सांगतो..

शेक्सपिअरच्या ज्युलियस सीझर  या नाटकामुळे अजरामर झालेला हा उद्गार...आणि तो दिवस होता ख्रिस्तपूर्व ४४व्या वर्षातील  १५ मार्च. (15th March (latin - The Ides of March )44 BC )  

ज्युलियस सीझर हा वरील ख्रिस्तपूर्व काळातील रोम साम्राज्यामधील एक मातब्बर सेनापती होता. १५ मार्च हा दिवस उजाडला..  प्रथेप्रमाणे अनेक बैलांचा बळी देऊन तो सिनेट मध्ये आला. त्याचे इतर सिनेट सहकारी आधीच उपस्थित होते. सीझरने एका अर्जावर काहीतरी हुकूम केला आणि हीच खूण समजून   सिनेट मधील एकजण उठला आणि काही कळायच्या आत त्याने  ज्युलियस सीझरच्या पोटात कट्यार खुपसली आणि सीझर  ' पाँपीच्या (एक तालेवार रोमन सरदार) पुतळ्याजवळ कोसळला आणि मग या कटात सामील असणारे एक एक जण पुढे येऊन सीझरला भोसकत गेले आणि यामध्ये आपण ज्याला जीवा—भावाचा मित्र, सखा समजत होतो तो ब्रुटस देखील समोर आल्यावर सीझर उद्विग्नपणे म्हणाला Et tu, Brute? - "also you, Brutus?", ब्रुटस यू टू ? आणि हा प्रसंग बघू नये म्हणून सीझरने  त्याचा पायघोळ झगा (toga ) डोळ्यावर ओढून घेतला.

अर्थात सीझर विरुद्ध कट करण्यासाठी सीझरची वागणूक आणि तत्कालीन परिस्थिती कारणीभूत होती. प्रमुख कारण म्हणजे एका गटाला भीती होती की तो राजेशाही पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहे . असो. त्यात काही आपल्याला जायचे नाही.

लिहिण्याचे तात्पर्य हे की एखादे वाक्य, म्हण कशी निर्माण झाली या बाबतची पार्श्वभूमी माहिती असल्यास त्या वाक्याचे/ म्हणीचे महत्त्व जास्त समजते.. असो.

आपल्यावर सीझर असो वा ब्रुटस, कोणतीच वेळ येऊ नये🙏..

ॲड. रोहित एरंडे ©

Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©