एम्प्लॉयमेंट बॉण्ड कायदेशीरदृष्टया वैध करार : सर्वोच्च न्यायालय.: ॲड. रोहित एरंडे ©
एम्प्लॉयमेंट बॉण्ड कायदेशीरदृष्टया वैध करार : सर्वोच्च न्यायालय. ॲड. रोहित एरंडे © आपण रोजच्या आयुष्यात अनेक वेगवेगळे करार करत असतो आणि असा कुठलाही करार हा वैध ठरण्यासाठी तो करार जेव्हा दोन सज्ञान व्यक्तींमध्ये (ज्यामध्ये कंपनीही येते,) वैध कारणांसाठी, स्वेच्छेने, मोबदला स्वीकारून आणि वैध हेतूसाठी आणि सार्वजनिक हिताला बाधा न आणणारा, अस्तित्वात आणलेला असला पाहिजे.. नोकरी करणाऱ्यांसाठी आणि नोकरी देणाऱ्यांसाठी एम्प्लॉयमेंट बॉण्ड (Employment Bond ) हा नोकरीच्या उमेदवारीच्या - प्रोबेशनच्या काळातील मूलभूत आणि महत्वाचा करार असतो ज्यामध्ये कर्मचारी आणि मालक यांच्यात एक विशिष्ट कालावधीसाठी करार केला जातो ज्यामध्ये ,कर्मचाऱ्याने ठराविक कालावधीसाठी कंपनीमध्ये काम करणे आवश्यक असते आणि कंपनीही कर्मचाऱ्यावर ट्रेनिंग इ. साठी मेहनत घेते, खर्च करते आणि जर कर्मचाऱ्याने ठरलेल्या वेळेच्या आत नोकरी सोडली, तर त्याला काही विशिष्ट रक्कम (बॉण्ड अमाऊंट) भरावी लागते असे करारात नमूद केलेले...