सासऱ्याच्या मिळकतीमध्ये नणंदेचे हक्क किती ?: ॲड. रोहित एरंडे ©
सासऱ्याच्या मिळकतीमध्ये नणंदेचे हक्क किती ? सर आमच्या घरात माझ्या ३ नणंदा आहेत. एक अहिवाहित आहे आणि दोघींची लग्ने झाले आहेत. माझे यजमान सर्वात छोटे आहेत. माझे सासरे नुकतेच अचानक मयत झाले. त्यांनी इच्छापत्र केलेले नव्हते. त्यांच्या नावावर बरीच मिळकत होती, मात्र सासूबाई आणि ३ नणंदा यांचेच आमच्याकडे चालते माझ्या यजमानांनी तिन्ही बहिणींसाठी खूप कष्ट केले, मात्र त्यांच्या सध्या स्वभावाचा फायदा घेऊन ते सर्व एक झाले आहेत. सासूबाईंनी परस्पर ३ बक्षीसपत्रे करून ३ नणंदा यांना सासऱ्यांची एक एक प्रॉपर्टी देऊन टाकली. आता आम्ही काय करावे ? आमच्या मुलाबाळांना काहीच मिळणार नाही का ? एक वाचक, पुणे जिल्हा ऍड. रोहित एरंडे.© नणंद म्हणजेच नवऱ्याची बहीण या व्यक्तिरेखेचे बऱ्याच घरात वर्चस्व असते आणि सुनांविरुध्द होणारी घरगुती भांडणे, हिंसाचार यामध्ये नणंद -सासू यांची जोडी असल्याचे दिसून येते आणिवर्तमानपत्रामध्ये अश्या अनेक बातम्या आपण वाचल्या असतील. नणंद म्हटल्यावर "सत्वर पाव ग मला, भवानी आई रोडगा वाहि...