बंगलो सोसायटी आणि रिडव्हलपमेंट : ॲड. रोहित एरंडे. ©
बंगलो सोसायटी आणि रिडव्हलपमेंट : ॲड. रोहित एरंडे. © आमच्या बंगलो सोसायटीमध्ये ९९९ वर्षांच्या लीजने दिलेल्या प्लॉटवर सभासदांनी बंगले बांधले आहेत. आता काही सभासदांना बंगले पाडून /२ प्लॉट एकत्र करून करून रिडव्हलपमेंट करायचे आहे. सोसायटीच्या नियमांप्रमाणे जास्तीत जास्त १+३ एवढेच बांधकाम करता येते, तर काही सभासदांच्या मते मिळणाऱ्या एफएसआय प्रमाणे जास्तीत जास्त बांधकाम करता यायलाच पाहिजे. काही सभासदांचा या रिडव्हलपमेंटलाच विरोध आहे. नवीन बिल्डिंगची सोसायटी करता येते का ?याबाबत कृपया मार्गदर्शन करावे. एक वाचक, पुणे आपल्यासारखे प्रश्न हे अश्या अनेक बंगलो सोसायट्यांमध्ये सुरु झाले आहेत आणि प्रत्येकाच्या फॅक्टस वेगळा असू शकतात आणि या प्रश्नांचा विस्तृत उहापोह जागेअभावी येथे करणे शक्य नाही. असो. तरीही आपल्या प्रश्नाच्या अनुषंगाने काही कायदेशीर संकल्पना समजून घेणे भाग आहे. पाश्चात्य देशांमध्ये ज्याची जमीन तोच त्...