रिडेव्हल्पमेंट : प्लॅन मंजूर झाल्यावरच जुनी जागा सोडणे हिताचे. ॲड. रोहित एरंडे ©
रिडेव्हल्पमेंट : प्लॅन मंजूर झाल्यावरच जुनी जागा सोडणे हिताचे. ॲड. रोहित एरंडे © आमच्या इमारतीच्या पुनर्विकासाचे काम सुरु होऊन डेव्हलपमेंट ऍग्रिमेंट झाले आहे. मात्र अजून प्लॅन मंजूर झालेला नाही. असे असतानाही संस्थेचे पदाधिकारी आणि बिल्डर आम्हावर जागेचा ताबा देण्यासाठी दबाव आणत आहेत आणि ताबा देताना लोखंडी दरवाजे, ग्रील इ. काढू नये असेही त्यांचे म्हणणे आहे. तसेच संपूर्ण ताबा मिळाल्याशिवाय बिल्डर भाडे देणार नाही असे म्हणत आहे. तर याबाबत नक्की काय करावे ? एक वाचक, पुणे. रिडेव्हल्पमेंटचा डोंगरही दुरून साजरा असतो, पण जस जसे तुम्ही जवळ येत तस-तसे अनेक चढ-उतार यायला लागतात. प्रत्येक रिडेव्हल्पमेंट केस ही वेगळी असते आणि त्याप्रमाणे प्रत्येकाच्या अटी शर्ती याही वेगळ्या असणारच. प्रत्येक सोसायटी / अपार्टमेंटने सुरुवातीलाच जास्तीची जागा किती मिळणार, इतर आर्थिक फायदे इ. अटींबरोबरच बेसिक एफएसआय चा प्लॅन मंजूर झाल्यावर जागा सोडायची, का "पूर्ण पोटेन्शिअल" चा प्लॅन मंजूर झाल्यावर सो...