ताबा माझाच.. ॲड. रोहित एरंडे ©
ताबा माझाच... (कोर्टातील बरेच वाद हे जागेचा ताबा वाचवण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी असतात आणि म्हणूनच कायद्यामध्ये ताब्याला १० पैकी ९ मार्क असे का म्हणतात ते ह्या मजेशीर प्रसंगातून कळेल. ) ॲड. रोहित एरंडे. © मागे आपण बँक लॉकरचा मजेशीर किस्सा वाचला. आता लोकाग्रहास्तव परत एकदा असाच एक पोट धरून हसविणारा किस्सा सांगतो. मानवी स्वभावाच्या खऱ्या पैलूंचे दर्शन कोर्टामध्ये होते. सगळ्यांचे मुखवटे तिथे गळून पडलेले असतात. कोर्टातील विविध दाव्यांपैकी घरमालक -भाडेकरू ह्यांच्यामधील दावे पूर्वी खूप हिरीरीने भांडले जायचे आणि कधी कधी कारणे देखील खूप मजेशीर असायची/. अर्थात आता जुने वाडेच राहिले नसल्याने ह्या केसेस कमी झाल्या आहेत. असो. काही वर्षांपूर्वी पुणेरी बाण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पेठेमधील एका जुन्या वाड्यातील जागेची केस आम्ही घरमालकातर्फे लढवत होतो . ह्या केस मध्येएक मजेशीर प्रश्न उद्भवला की वाड्यामधील सामाईक संडास कोणाच्या ताब्यामध्ये आहे. आचार्य अत्रे म्हणायचे तसे जुन्या वाड्यांमध्ये आत गेल्या गेल्या डावी-उजवीकडे 'जय-विजय' सारखे संडास तुमचं स्वागताला असायच...