"मृत्यूपत्राद्वारे मिळालेली मिळकत स्वकष्टार्जित " - ॲड. रोहित एरंडे. ©
"मृत्यूपत्राद्वारे मिळालेली मिळकत स्वकष्टार्जित " सर, आमचे वडील २ वर्षांपूर्वी गेले. आमच्या वडिलांनी एक नोंदणीकृत मृत्यूपत्र करून ठेवले आहे त्यायोगे त्यांनी सर्व मिळकत मला दिली आहे आणि माझ्या बहिणीला मृत्यूपत्राने काहीच दिले नाही कारण तिला लग्नात जे काही द्यायचे ते दिले होते असे नमूद केले आहे. मी executor पण आहे. आता माझ्या हयातीमध्ये या फ्लॅटमध्ये माझ्या बायको -मुलांचा आणि बहिणीचा हक्क येतो का ? कृपया मार्गदर्शन करावे. एक वाचक, मुंबई. एखाद्या मिळकतीमध्ये मालकी हक्क नोंदणीकृत - खरेदीखत, बक्षीसपत्र, हक्कसोड पत्र, वाटप-पत्र यांसारख्या दस्ताने हयातीमध्ये तबदील केला जाऊ शकतो. तर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर मिळकतीमधील मालकी हक्क हा मृत्यूपत्राने किंवा मृत्यूपत्र केले नसेल तर वारसा हक्काने तबदील होऊ शकतो. मृत्यूपत्राप्रमाणे मालकी हक्क हा मात्र मृत्यूपत्र करणारी व्यक्ती (टेस्टेटर) मयत झाल्यावरच प्राप्त होतो आणि मृत्युप...