Posts

Showing posts from July 22, 2025

रिडेव्हलपमेंट : नवीन फ्लॅटवर मुलांचे नाव कसे लावावे ? ॲड. रोहित एरंडे ©

   रिडेव्हलपमेंट : नवीन फ्लॅटवर मुलांचे नाव कसे लावावे ? ॲड. रोहित एरंडे © अखेर अनेक वाद-विवादानंतर आमची सोसायटी आता रिडेव्हलपमेंटला  जाणार आहे. आमच्या सारख्या बऱ्याचश्या  ज्येष्ठ  सभासदांना नवीन फ्लॅटवर मुला / मुलीचे नाव घालायचे आहे. यासाठी  डेव्हलपमेंट ऍग्रिमेंटमध्ये  आमच्या ऐवजी  मुलांचे नाव घातले तर चालेल का ? का अजून काही करणे गरजेचे आहे ?   एक ज्येष्ठ नागरीक, पुणे  'कुठलीही गोष्ट घडण्यास वेळ यावी लागते' असे म्हणतात ते रिडेव्हलपमेंटबाबत तंतोतंत लागू होते. कुठली अडचण दत्त म्हणून उभी राहील हे काही सांगता येत नाही. असो.  तुमच्या सारख्या अनेक ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या उमेदीच्या काळात कष्टाने घेतलेल्या फ्लॅटचे  आता चीज होईल असे म्हणण्यास हरकत नाही. मात्र अश्या नवीन , मोठ्या क्षेत्रफळाचा आणि आधुनिक सोयी सुविधांनी मिळणार फ्लॅटमध्ये  आपल्या मुला -मुलींचे  किंवा आपल्या जोडीदाराचे नाव त्यात घालायचे असते  , पण नक्की काय करायचे हे अनेकांना लक्षात येत नाही. सबब  याची थोडक्यात माहिती घेऊ.  अर्थात  ...