" पुनर्विकास : एलओआय हे बंधनकारक करारपत्र नाही" : ॲड. रोहित एरंडे ©
" पुनर्विकास : एलओआय हे बंधनकारक करारपत्र नाही" : ॲड. रोहित एरंडे © आमच्या सोसायटीने पुनर्विकासासाठी २ वर्षांपूर्वी एक बिल्डरने लेटर ऑफ इन्टेन्ट (LOI ) दिले होते. सोसायटीने तेव्हा वकील नेमले नव्हते. LOI च्या मुदतीमध्ये बिल्डरने काहीही केलेले नाही. सोसायटीचे काही पदाधिकारी त्या बिल्डरला अजूनही धार्जिणे आहेत. आता अचानक तो बिल्डर जागा झाला आहे आणि LOI सोसायटीवर बंधनकारक आहे आणि मलाच काम दिले नाहीतर प्रोजेक्ट होऊनच देणार नाही असे म्हणतोय, तर आता काय करावे आणि सोसायटीने स्वतःचे तज्ञ वकील आणि आर्किटेक्ट यांची नेमणूक करावी का ? एक ज्येष्ठ सभासद. , पुणे. आपल्या शेवटच्या प्रश्नाचे आधी उत्तर देतो. आपल्या सारख्या अनेक ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या तरुण वयात कष्टाने घेतलेल्या छोटेखानी घराचे पुनर्विकासामुळे मोठ्या घरात रूपांतर होण्याची संधी प्राप्त झाली आहे. मात्र पुनर्विकास हा 'विन-विन' म्हणजेच बिल्डर-सोसायटी या दोहोंच्य...