Posts

Showing posts from August 26, 2025

लिफ्ट-दुरुस्ती खर्चाची विभागणी. ॲड. रोहित एरंडे ©

 लिफ्ट-दुरुस्ती खर्चाची विभागणी.  ॲड. रोहित एरंडे © आमच्या बिल्डिंगमधील लिफ्ट  दुरुस्तीसाठी बऱ्यापैकी खर्च येणार आहे.  मात्र  तळ मजल्यावरील आणि पहिल्या मजल्यावरील सभासद,   आम्ही लिफ्ट वापरत नाही म्हणून लिफ्टच्या दुरुस्तीचे पैसे देणार नाही असे म्हणत आहेत. जे लिफ्ट वापरतात त्यांनीच पैसे द्यावेत असे त्यांचे म्हणणे आहे.   कृपया मार्गदर्शन करावे   एक वाचक, पुणे.  सोसायटी आणि सभासद यांच्यामधील बहुतांशी वादाचे मूळ आर्थिक कारणांशी असते हे या प्रश्नावरून परत एकदा दिसून येते. लिफ्टदुरुस्ती खर्चावरून     मानवी स्वभावाचे  विविध रंग दिसून येतात त्यामुळे   काही ठिकाणी तर ज्यांनी लिफ्ट दुरुस्तीचे पैसे दिले आहेत, तेवढ्याच मजल्यावर लिफ्ट थांबेल असेही प्रकार बघितले आहेत. सर्वप्रथम लिफ्ट   चैनीची वस्तू नसून आवश्यक गोष्ट आहे आणि  कोणत्या सभासदाने लिफ्टसारख्या कोणत्या सामायिक सोयी सुविधा किती वेळा  वापरल्या कसे याचा माग कोण ठेवणार ? आणि ते अपेक्षित नाही.      दुरुस्त आदर्श उपविधी क्र....