बँक खाते उघडण्यास आधार कार्डाची सक्ती करता येणार नाही :ॲड. रोहित एरंडे ©
बँक खाते उघडण्यास आधार कार्डाची सक्ती करता येणार नाही : ॲड. रोहित एरंडे © आधार कार्ड नाही म्हणून बँक खाते उघडण्यास नकार मिळालेल्या ८४ वर्षीय आई आणि तिची अविवाहित मुलगी एवढे संचालक असलेल्या कंपनीने जानेवारी २०१८ मध्ये याचिका दाखल केली होती कारण याचिकाकर्त्याच्या मते मुंबई सारख्या ठिकाणी बऱ्याच स्थावर मिळकती असूनसुद्धा त्या भाड्याने देता येत नव्हत्या कारण केवळ आधार कार्ड नाही म्हणून बँकेत खाते काढता येत नव्हते आणि पर्यायाने उत्पन्नाचा एकमेव स्रोत असलेले भाडे स्वीकरता येत नव्हते. त्यावर सप्टेंबर २०१९ मध्ये अंतरिम हुकूमाद्वारे रोजी मुंबई उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या "राईट टू प्रायव्हसी " या गाजलेल्या निकालाचा आधार घेऊन येस बँकेस आधार कार्डाशिवाय खाते उघडून देण्याचाच आदेश दिला होता आणि त्याप्रमाणे बँकेने खाते उघडुनही दिले. मात्र या जानेवारी २०१८ ते सप्टेंबर २०१९ या महिन्यांच्या कालावधीमध्ये मिळकती भाड्याने न देता आल्याने जे नुकसान झाले त्यापोटी १० लाख रुपयांची मागणी केली होती. मा...