Posts

Showing posts from September 16, 2025

सभासदत्व आणि मालकी हक्क यात फरक. ॲड. रोहित एरंडे ©

 सभासदत्व आणि मालकी हक्क यात फरक.  ॲड. रोहित एरंडे © आमच्या   वडिलांनी रजिस्टर्ड बक्षीसपत्राने  त्यांचा फ्लॅट मला दिला, माझे नावे शेअर सर्टिफिकेट ही झाले. मात्र नॉमिनी म्हणून माझ्या भावाचे त्यांनी नाव लावले होते. वडील काही वर्षांपूर्वी गेले.  मात्र अचानक आता माझ्या भावाला हे बक्षीस पत्र मान्य नाही असे म्हणून त्याने सोसायटी पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून त्याचे नाव असोसीएट सभासद म्हणून शेअर सर्टिफिकेटवर लावण्याचा हुकूम देखील मिळवला आहे, कारण पुनर्विकासाची शक्यता. आम्ही  दोघेही ज्येष्ठ नागरीक आहोत.  भावाची परिस्थिती उत्तम आहे, तो गेले अनेक वर्षे या फ्लॅट् मध्ये फिरकलेला  नाही आणि  मला हा एकच फ्लॅट आहे. तरीही भाऊ त्याचा हट्ट सोडत नाही याचे वाईट वाटते आणि आता त्याला सोसायटीच्या कामकाजात देखील भाग घ्यायचा आहे. तरी काय करावे ?   एक वाचक, मुंबई.  सोसायटीमध्ये बरेचदा मूळ सभासद मयत झाल्यानंतर त्याच्या वारसांमध्ये आणि नॉमिनी मध्ये वाद निर्माण होतात.  तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जर तुमच्या लाभात वडिलांनी नोंदणीकृत आणि वैध  बक्षी...