Posts

Showing posts from September 30, 2025

पॉवर ऑफ ऍटर्नी - समज कमी गैरसमज जास्त. ॲड. रोहित एरंडे.©

 पॉवर ऑफ ऍटर्नी - समज कमी गैरसमज जास्त.  ॲड. रोहित एरंडे.© सर, मी एका व्यक्तीला माझी जागा विकायचे ठरवत आहे , कारण तो मला इतरांपेक्षा जास्त  किंमत देऊ करत पहात आहे मात्र काही कारणांनी मला स्वतःला व्यवहार करणे शक्य होत नाही, म्हणून त्याला मालकी मिळेल यासाठी  ती व्यक्ती माझ्याकडे  नोटरी केलेली   पॉवर ऑफ ऍटर्नी  मागत आहे म्हणजे  आणि आता घाई करत आहे. पण असे व्यवहार करण्यात काही धोके आहेत का ? एक वाचक, पुणे.   "अती लोभ त्यास क्षोभ होईल जाणा " -  हे समर्थ वचन इथे लागू होते. कारण  जास्त किंमतीच्या लोभाने आणि तेही  अनोंदणीकृत पॉवर ऑफ ऍटर्नीच्या आधारे तुम्ही जर हा व्यवहार केलात तर नंतर कोर्टाच्या पायरांवर पायऱ्या चढायची तयारी ठेवा. तरीही तुम्हाला धन्यवाद कारण तुमच्या प्रश्नामुळे पॉवर ऑफ ऍटर्नी (पीओए) म्हणजेच कुलमुखत्यारपत्र या अत्यंत महत्वाच्या विषयाबद्दल  कायदेशीर तरतुदींची थोडक्यात माहिती बघू. पॉवर ऑफ ऍटर्नी ऍक्ट १८८२ आणि कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट १८७२ मध्ये या बद्दलच्या तरतुदी आढळून येतात. *आपल्या वतीने ठराविक गोष्टी करण्यासाठी ...