" थार वेडे.." 😀 : ॲड. रोहित एरंडे
" थार वेडे.." 😀 लिंबू हे आहारशास्त्रात जेवढे महत्वाचे आहे ना तेवढेच धार्मिक कार्यात, विशेषतः नवीन कार घेताना, देखील आहे हे आपल्यापैकी अनेकांना माहिती असेलच.. अशा एका लिंबापायी वाचायला मजेशीर पण जीवावर येणारा प्रसंग दिल्लीमध्ये घडला. याचे व्हिडीओ देखील इंटरनेटवर आहेत. तर, दिल्लीमधील या जोडप्याने महिंद्रा कंपनीची प्रसिद्ध असलेली थार गाडी खरेदी केली. गाडी डिलिव्हरी साठी शोरुम मध्ये गेले.. शोरुम होती पहिल्या मजल्यावर., गाडीला हार घालून ठेवला होता. गाडीच्या समोरील काचेतून जोडपे आनंदाने खाली बघत होते.. आता इथे लिंबाचा प्रवेश झाला.. या जोडप्याची अशी मान्यता होती, की कोणतीही नवीन गाडी घेतली की गाडीचे चाक पहिल्यांदा लिंबावरून नेले पाहिजे...त्याप्रमाणे चाकाखाली रसरशीत लिंबू ठेवली. मॅडमने दिमाखात स्टिअरिंग हातात घेतले.. वामांगी पतीदेव आणि मागे एक ( बिचारा ) एम्प्लॉयी पण बसला.. मॅडमने स्टार्टर मारला आणि लिंबावरून गाडी न्यायची म्हणून ऍक्सेलेटर वर "हळूच" पाय ठेवला आणि...... आणि... लिंबू डाव झाला... लिंबाने आपले बलिदान दिले पण गाडी मात्र शोरूमची काच पिक्चरसारखी फोडून आतल्य...