नॉमिनी सभासदाला मतदानाचा हक्क : ॲड. रोहित एरंडे ©
नॉमिनी सभासदाला मतदानाचा हक्क : ॲड. रोहित एरंडे © आमच्या फ्लॅटसाठी माझ्या वडिलांनी मला नॉमिनी नेमले होते त्याआधारे वडिलांच्या मृत्युनंतर मी सोसायटीमध्ये सभासदत्व मिळविण्यासाठी अर्ज दिला, पण सोसायटीने माझे नाव शेअर सर्टिफिकेटवर प्रोव्हिजनल सभासद म्हणून लावले आणि जो पर्यंत कोर्टातून वारसा हक्क प्रमाणपत्र अनंत नाही तो पर्यंत मी मतदान करू शकत नाही असे म्हणून सोसायटी मला कुठल्याही सभांमध्ये भाग घेऊन देत नाही. सोसायटी रिडेव्हल्पमेंटला जाण्याचे ठरवत आहे. कृपया मार्ग सांगा. एक वाचक, पुणे. उत्तर : सोसायटीमध्ये मूळ सभासद मयत झाल्यानंतर त्याच्या वारसांमध्ये आणि नॉमिनी मध्ये बऱ्याचदा वाद निर्माण होतात . परंतु सहकार कायद्यात झालेल्या बदलाप्रमाणे कलम १५४(बी) हे नवीन कलम ९ मार्च २०१९ पासून दाखल झाले आहे, . ज्यायोगे सभासदांच्या व्याख्येमध्ये पहिल्यांदाच नॉमिनी म्हणून नेमलेल्या व्यक्तीला "प्रोव्हिजनल मेंबर " म्हणजेच थोडक्यात कारणापुरता /तात्पुरता सभासद म्हणून म...