Posts

Showing posts from November 2, 2025

"मोल" गृहिणीच्या कामाचे...: ॲड. रोहित एरंडे ©

  "मोल" गृहिणीच्या कामाचे... कधी दिवसांपूर्वी कॉलेजमधील मित्रमंडळी बऱ्याच दिवसांनी एकत्र जमलो होतो. हास्य विनोद चालू होते. सगळ्यांची मुले, सध्या ज्यांना "चुणचुणीत" म्हणतात, ती देखील सामील झाली होती . काम-धंदयाबरोबरच घरातले काम पण सर्वांनी वाटून घेतले पाहिजे असा विषय चालू असताना एक मुलगा म्हणाला, घरकाम हे काही आमचे काम नाही, ते आई करते, मी बाबासारखा मोठा बिझनेसमन होणार, तो खूप काम करतो आणि पैसे कमावतो ... क्षणभर एकदम शांतता पसरली आणि आमचं मैत्रिणीच्या डोळ्यात टचकन पाणी आले. कॉलेज दिवसात टॉपर असणारी आणि नंतर स्वतःचे बुटीक सुरु करणारी हुशार मुलगी डोळ्यासमोर आली.   हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे दरवर्षी ३ नोव्हेंबर हा दिवस जागतिक गृहिणी दिवस म्हणून साजरा केला जातो. गृहिणी म्हणजे Housewife असे म्हणतात. मात्र २०२३ मध्ये तत्कालीन सरन्यायाधीश श्री. धनंजय चंद्रचूड यांच्या पुढाकाराने सर्वोच्च न्यायालयाने A Handbook on Combating Gender Stereotypes अशी पुस्तिका प्रसिध्द केली आणि त्यामध्ये सर्वप्रथम Housewife ऐवजी Homemaker हा शब्द वापरावा असे नमूद केले आहे. या ...