कन्व्हेयन्स झाला नसल्यास सोसायटीच्या पुनर्विकासाचा मार्ग खडतर. ॲड. रोहित एरंडे ©
कन्व्हेयन्स झाला नसल्यास सोसायटीच्या पुनर्विकासाचा मार्ग खडतर. प्रश्न : आमच्या सायटीची स्थापना होऊन सुमारे ३५ वर्षे झाली आहेत. आता बिल्डिंगची अवस्था बघता आणि सोयी-सुविधांचा अभाव असल्याने पुनर्विकास करण्यासाठी सभासदांचे. परंतु अद्याप सोसायटीच्या नावे कन्व्हेयन्स झालेला नाही, प्रॉपर्टी कार्डवर सोसायटीचे नाव नाही. तरी या बाबत काय करावे, हे सर्व नवीन बिल्डर करून देईल का ? सोसायटी सभासद, पुणे. उत्तर : पुनर्विकास पहावा करून , अशी नवीन म्हण आता प्रचलित झाली आहे. पुनर्विकास करण्यापूर्वी अनेक कायदेशीर बाबींची पूर्तता करणे गरजेचे असते आणि याची माहिती बरेचदा सभासदांना नसते आणि अशी पूर्तता झाली नसेल आणि बाकी सर्व ठरले असले तरी पुनर्विकास प्रत्यक्षात सुरु होऊ शकत नाही. या मध्ये सर्वात महत्वाचे असते सोसायटीच्या नावाने कन्व्हेयन्स होणे आणि सोसायटीचे नाव प्रॉपर्टी कार्ड सदरी असणे. कन्व्हेयन्स म्हणजे जागेमधील मालकी हक्क दुसऱ्याच्या नावे तबदील करणे, थोडक्यात खरेदी खत असे म्हणता येईल. भारतामधील ...