Posts

Showing posts from October 26, 2025

मेंटेनन्स : सोसायटीमध्ये समान तर अपार्टमेंटसाठी क्षेत्रफळाप्रमाणे. ॲड. रोहित एरंडे ©

 मेंटेनन्स : सोसायटीमध्ये समान तर अपार्टमेंटसाठी क्षेत्रफळाप्रमाणे.   ॲड. रोहित एरंडे © काही दिवसांपूर्वी अपार्टमेंटसाठी जागेच्या क्षेत्रफळाप्रमाणेच मेंटेनन्स आकारता येईल असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला. हा निकाल सोसायटीला देखील लागू होईल ना ? आमच्या सोसायटीमध्ये देखील २,३ आणि ४ बीएचके असे वेगवेगळे फ्लॅट आहेत. या निकालावरून आमच्याकडे सोसायटी व्हाट्सअप ग्रुपवर खूप चर्चा, भांडणे होत आहेत, तरी कृपया या विषयाचा खुलासा करावा.  एक वाचक, पुणे.  सर्वप्रथम आपण हा प्रश्न विचारल्याबद्दल आपल्याला धन्यवाद. या "स्पष्ट" निकालानंतर सुद्धा अनेक लोकांच्या मनात शंका-कुशंका उपस्थित झाल्याचे दिसून आले. सोसायटी असो वा आपार्टमेन्ट सभासदांमधील बहुतांशी वादाचे कारण हे आर्थिक बाबींबद्दल असते. मा. उच्च न्यायालयाने पुण्यातील प्रसिध्द ट्रेझर पार्क या ३५६ सभासदांच्या अपार्टमेंट बाबतीत जो निकाल दिला आहे तो म्हणजे गदिमांच्या भाषेत "अतर्क्य ना झालें काहीं, जरी अकस्मात" असे वेगळ्या अर्थाने म्हणता येईल. कारण मा. न्यायालयाने कोणताही नवीन कायदा सांगितला नसून १९७० पासू...