रिडेव्हलपमेंट ७९अ नियमावली केवळ मार्गदर्शक, : मुंबई उच्च न्यायालय. : ॲड. रोहित एरंडे ©
रिडेव्हलपमेंट ७९अ नियमावली केवळ मार्गदर्शक, : मुंबई उच्च न्यायालय. आमच्या सोसायटीच्या रिडेव्हलपमेंटसाठी आम्ही जनरल बॉडी मध्ये रितसर ठावर ठराव पास करून बहुमताने पुनर्विकासाचा निर्णय घेतला. नंतर टेंडर मागवून अंतिम ३ पैकी १ विकसक देखील निवडला. मात्र आता काही २-३ सभासद कमिटी विरुध्द आणि ७९अ नियमावली पाळत नाही, मिटिंग चुकीची घेतली, चुकीचा बिल्डर निवडला, असे खोटे आरोप करून उपनिबंधक साहेबांकडे तक्रारी करत आहेत त्यामुळे आम्हाला काम करणे नकोसे झाले आहे. या बाबत काय करावे ? त्रस्त सदस्य; कमिटी ., पुणे रिडेव्हलपमेंट पाहावे करून असे आम्ही नेहमी म्हणतो रिडेव्हलपमेंटचे प्रश्न हे काळे - पांढरे नसतात, त्याचा रंग करडा असतो हे दिसून येईल. रिडेव्हलपमेंटमधील वाढते वाद लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने सहकार कायदा कलम ७९अ अंतर्गत २००९ साली प्रथम आणि नंतर २०१९ साली सुधारित अशी फक्त सोसायट्यांसाठी नियमावली जारी ...