बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©
बक्षीस पत्र (Gift Deed) - महत्वाचा दस्त ऐवज
ऍड. रोहित एरंडे ©
लोकांच्या जिव्हाळ्याच्या असेलल्या ह्या दस्ताबद्दल आपण माहिती करून घेवू..
खरेदी-खत, हक्क-सोड पत्र , मृत्यूपत्र ह्यांच्याबरोबरच बक्षीस पत्र म्हणजेच "गिफ्ट डिड" हा मिळकतीमधील मालकी हक्क तबदील करण्याचा एक लोकप्रिय दस्तऐवज आहे. ह्यामधील मृत्यूपत्र सोडता इतर सर्व दस्तांची अंमलबजावणी ही संबंधित व्यक्तींच्या हयातीत होते. बहुतांशी वेळा जवळच्या नात्यामध्ये प्रेमापोटी, आपुलकीपोटी केला जाणाऱ्या ह्या दस्ताबद्दलच्या कायदेशीर तरतुदी ह्या ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट च्या कलम १२२ ते १२६ मध्ये अंकित केलेल्या आहेत. त्याची थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे
१. स्वतःच्या मालकिची आणि 'अस्तित्वात' (existing) असलेली स्थावर किंवा जंगम मिळकत बक्षिस पत्राने तबदील म्हणजेच ट्रान्सफर करता येते. थोडक्यात जी गोष्ट अस्तित्वात नाही तिचे बक्षीसपत्र करता येत नाही.
२. बक्षीस पत्र लिहून देणाऱ्या व्यक्तीस "डोनर" (दाता ) तर ज्याच्या लाभात ते लिहून दिले जाते त्या व्यक्तीस "डोनी" (लाभार्थी) असे म्हणतात.
३. खरेदी खत हे विनामोबदला करता येत नाही. उलटपक्षी बक्षीस पत्र हे "विना-मोबदलाच" असावे लागते. म्हणजेच मिळकतीमधील हक्क तबदील केल्याच्या बदल्यात डोनरला डोनी कढून कुठलाही मोबदला मिळत नाही. तसेच काही अटींना अधीन राहून म्हणजेच "कंडिशनल" बक्षीस पत्र देखील करता येते.
४. स्थावर (इममुव्हेबल) मिळकतीचे बक्षीसपत्र हे नोंदणीकृत करणे म्हणजेच "रजिस्टर" करणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यावर डोनर, तसेच २ साक्षीदारांनी सही करणे गरजेचे आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे डोनीने देखील "बक्षीस पात्र मान्य आहे" असे लिहून सही करणे गरजेचे आहे. ह्या अटींची पूर्तता झाली की बक्षीस पत्राद्वारे मालकी हक्क तबदील होतो.
जंगम (मुव्हेबल) मिळकतीचे बक्षिसपत्र हे नोंदणीकृत दस्ताने किंवा प्रत्यक्ष त्या वस्तूचा ताबा देऊन करता येते.
बक्षिस पत्र आणि स्टॅम्प ड्युटी :
महाराष्ट्र स्टॅम्प ऍक्ट अन्वये बक्षीसपत्र नोंदविण्यासाठी जी स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. सदरील कायद्याच्या अनुच्छेद ३४ अन्वये, जर का डोनरच्या कुटुंबातील सदस्यांना म्हणजेच नवरा, बायको, भाऊ किंवा बहीण ह्यांना बक्षीसपत्राद्वारे मिळकत द्यायची असेल तर त्या मिळकतीच्या बाजारभावाच्या तीन टक्के इतकी स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल. मात्र जर का सदरील मिळकत ही राहण्याची किंवा शेतीची असेल आणि बक्षीस पत्राद्वारे ती मिळकत नवरा, बायको, मुलगा, मुलगी, नातू, नात, मृत मुलाची पत्नी ह्यापैकी कोणाला द्यायची असेल तर केवळ दोनशे रुपये इतकीच स्टॅम्प ड्युटी आकारली जाईल. ह्या उपर इतर सर्व बक्षीसपत्रासाठी खरेदीखताप्रमाणे पूर्ण स्टॅम्प ड्युटी आकारली जाईल. ह्या मध्ये एक श्लेष असा आहे कि अजूनही पुण्यामध्ये स्टॅम्पड्युटी व्यतिरिक्त एक टक्का एल.बी.टी देखील आकारला जातो. असो .
५. बक्षीस पत्र 'अपवादात्मक' परिस्थितीमध्येच रद्द करता येते. जर एखादी विशिष्ट गोष्ट समजा घडली तर बक्षीस पत्र रद्द होईल, असे जर डोनर आणि डोनी ह्यांनी ठरविले असेल आणि तशी गोष्ट घडली तरच बक्षिस पत्र रद्द होऊ शकते. मात्र अशी विशिष्ट गोष्ट घडणे किंवा न घडणे ह्यावर डोनरचे नियंत्रण असेल, तर असे बक्षीसपत्र रद्द करता येत नाही. तसेच ज्याप्रमाणे एखादा करार रद्द करता येतो त्या कारणांनी देखील बक्षीपत्र रद्द करता येते
मा. सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच एका निकालाद्वारे हे स्पष्ट केले आहे की "कंडिशनल गिफ्ट डीड" हे त्या गिफ्ट डीड मधील कंडिशनची म्हणजेच पूर्वअटींची पूर्तता डोनीने न केल्यास ते रद्द करण्याचा अधिकार डोनरला आहे. (एस. सरोजिनी अम्मा विरुद्ध वेलायधून पिल्लई, दिवाणी अपील क्र . १०७८५/१८). ह्या केसची थोडक्यात हकीकत बघुयात. मूलबाळ नसल्यामुळे ७४ वर्षीय सरोजिनी अम्मा ह्यांनी त्यांच्या भाच्याला-वेलायधूनला बक्षीसपत्रवजा ट्रान्सफर डीड द्वारे द्वारे मिळकत दिली आणि काही मोबदला देखील स्वीकारला. मात्र ह्यात पूर्वअट अशी होती की वेलायधूनने त्यांची आणि त्यांच्या नवऱ्याची आयुष्यभर देखभाल करायची आणि त्या दोघांच्या मृत्यूनंतर बक्षीपत्राची अंमलबजावणी होईल आणि जागेचा मालकी हक्क आणि ताबा वेलायधूनला मिळेल. मात्र काही वर्षांनी सरोजिनी अम्मांनी सदरचे बक्षीपत्र रद्द केले आणि तसा दस्त देखील नोंदविला. त्यास वेलायधून कडून आव्हान देण्यात आले, आणि निकाल सरोजिनी अम्माच्या विरोधात जाऊन प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचते.
मा. सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले की ट्रान्सफर डीडमधील बक्षीसपत्राचा भाग हा 'कंडिशनल' होता आणि सबब डोनरला ते बक्षीसपत्र रद्द करण्याचा पूर्ण अधिकार होता. तसेच असेही पुढे नमूद केले की बक्षीसपत्राद्वारे एखाद्या मिळकतीमधील मालकी हक्क तबदील करण्यासाठी मिळकतीचा ताबा देणेही गरजेचे आहे, असा कुठलाहि कायदा नाही.
बक्षीसपत्र आणि मृत्यूपत्र एकत्र करता येते का ?
वरील केसमध्ये बक्षीस पत्र आणि मृत्यूपत्र एकत्र करता येते असाही प्रश्न उपस्थित झाला होता, मात्र त्यावर कुठलेही ठोस उत्तर दिलेले दिसून येत नाही. मात्र ह्या पूर्वी 'मथाई सॅम्युएल विरुद्ध इपिन' ह्या केसमध्ये २०१४ साली मा. सर्वोच न्यायालायने त्या केसच्या फॅक्टसच्या आधारे असा निकाल दिला की जरी कायदेशीर तरतुदींच्या अधीन राहून एकाच दस्तामध्ये मृत्यूपत्र आणि बक्षीसपत्र करणे गैर नसले तरी जर डोनीला (लाभार्थीला) डोनरच्या हयातीत कुठलेच हक्क मिळणार नसतील, तर ते मृत्युपत्र म्हणता येईल; कोर्ट पुढे असेही म्हणाले की मात्र एखाद्या दस्ताचे शीर्षक म्हणजेच हेडिंग काय आहे ह्यावरून तो दस्त काय आहे हे ठरत नाही, तर त्यातील सर्व तरतुदी एकत्रितरित्या वाचून मगच तो दस्त कोणता आहे हे ठरविता येते. उदा. बरेचवेळा 'विसार -पावती' असे शीर्षक असलेल्या दस्तामधील तरतुदी या साठेखतासारख्या असल्याचे दिसून येते, त्यामुळे कोर्टात देखील साठेखताच्या तरतुदी लागू होतात.
खरेतर ह्या वरील दोनही दस्तांची जातकुळी वेगळी आहे.मृत्यूपत्रासाठी कोणताही स्टँम्प द्यावा लागत नाही, त्याचे रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक नाही, लाभार्थ्यांना ते मान्य आहे असे लिहून द्यावे लागत नाही, . तर ह्या तीनही गोष्टी बक्षीसपत्रासाठी करणे अनिवार्य आहेत. तसेच मृत्यूपत्राचा अंमल हा ते करणाऱ्याचा मृत्यूनंतर होतो, तर बक्षीसपत्राद्वारे मिळकतीमधील हक्क आणि अधिकार हे त्या व्यक्तीच्या हयातीमध्येच तबदील होतात. सबब असे सरमिसळ असणारे दस्त केल्याने ते नसते केले तरच बरे असे नंतर म्हणायची वेळ येऊ शकते. सबब तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊन सोपे आणि सुटसुटीत दस्त करावेत.
धन्यवाद..
ऍड. रोहित एरंडे
©
Sir very good article
ReplyDeletethanks a lot
Deleteसर वरील बांधकामाचे बक्षीस पत्र करता येते काय
Deleteसर माझ्या आजीच्या नावाने १० एकर जमीन होती. आजीला ४ मुले व २ मुली आहेत त्यापैकी ४ नंबर च्या चुलत्याने बाकीच्या कोणाची समंती न घेता आजीकडून त्याच्या मुलाच्या नावाने ऑक्टोबर २०१८ मध्ये घरातील कोणालाही न सांगता गपचुप पद्धतीने २.५ एकर जमिनीचे बक्षिसपत्र केले ...हे बक्षिसपत्र केलेले आम्हाला ६ महिन्या नंतर समजले ....त्यावेळी वडिलांनी घरात भांडणे तंटा नको म्हणून सोडून दिले ... त्यानंतर २ नंबर च्या चुलत्याने ४ एकर खरेदीखत करून घेतले आणि ३ नंबर च्या चुलत्याने ०२ सप्टेंबर २०२२ ला त्याच्या नावाने ३३ गुंठयाचे बक्षिसपत्र केले आहे ...तर आता आम्हाला यावर आणि जे पाठीमागे बक्षिसपत्र केले आहे यावर आक्षेप घ्यायचा असेल तर काय करावे लागेल....आणि आजीचे वय हे ८० वर्षापेक्षा जास्त आहे ...कृपया सर माहिती मिळावी ...
DeleteSir,majhya vadilani mala n kalu deta majhya putnya chya navane bakshish Patra kele aahe tyala challenge karta yete ka?rahate Ghar aahe.
Deleteमाहिती अत्यंत महत्त्वाची आहे. बक्षीस पत्राचा नमुना समाविष्ट केल्यास अधीक चांगले होईल
ReplyDeleteधन्यवाद. जागेअभावी नमुना देता येत नाही.
DeleteSir
Delete.amchi बक्षीस पत्राची jamin ahe mhnje sarkarne 99 varshacha karar krun dileli ahe tarr ti vikta yete ka
सर,
Deleteबक्षीस पत्राचा नमुना बगायला मिळेल का
आमचे आजोबा हयात असताना त्यांनी त्यांचा भावाकडून ४-५ गुंठे जमीन घर बांधण्यास मागून घेतली होती. गेली ३० ते ४० वर्षांपासून तिथे आमचे घर आहे. त्यावेळी जमीन घेतल्यावर कुठलाही कागदी व्यवहार झाला नाही. आता आमाला ती जमीन आमच्या नावावर (बक्षीस पात्र द्वारे )करून घ्यायची आहे. आणि ह्यासाठी जमीन देणाऱ्यांचीसुद्धा हरकत नाही आहे. तरी अश्याप्रकारे बक्षिस पत्राद्वारे जमीन नावावर करून घेण्याची प्रोसेस कशी आहे आणि साधारण किती खर्च येईल ? जमीन सिंधुदुर्ग मध्ये आहे.
ReplyDeleteनोंदणी फी 200, स्टॅम्प ड्युटी 200, दस्त हाताळणी 400 , कागदपत्रे तयार करणे 400 असे एकूण 1200 रुपये खर्च होईल
Deleteमुलगा हयात असताना मुलींच्या नावाने बक्षिसपत्र करता येते का???
DeleteVadilopatrit jaminiche bakshish patra cancel karta yete ka
Deleteमी माझ्या मुलांच्या नावावर माझे गावचे घर आणि शेत जमीन बक्षीस पत्र केले आहे आणि मुलांचे वय अठरा पेक्षा कमी असल्याने माझे वडील आजोबा ह्यांना अ. पा. क .म्हणून नेमण्यात आले आहे पण मिळते गैरसोय चे वाटत आहे तर मला अ .पा .क. बदलता येईल का, मी स्वतः मुलांचे वडील अ पा क होऊ शकतो का?
ReplyDeleteहो पण त्रास घेऊ नका अपका ती जमीन विकू शकत नाही मी
DeleteSir amhala sarkarne 99 varshachya kararavr bakshis Patra keleli jamin dili aheee trr ti vikta yete ka
Delete70 वय झालेल्या अंध व्यक्ती चे बक्षिसपत्र ग्राह्य धरले जाते का?
ReplyDeleteमाझे आजोबा 92 वर्ष चे आहेत अन् जमिन वडिलोपार्जित आहे
Deleteम्हाडा che एक घर माझ्या आईचे नावावर आहे तिनी मृत्यू पत्र केले नाहि मी बहिणी कडून रजिस्टर hakkasodpatra करून घेतले आहे तर ते घर मी आत्ता मुलांच्या नावावर बक्षीस पत्र करू शकतो का
ReplyDeleteहो
Deleteऑनलाईन बक्षीस पत्र पाहायचे असल्यास कोणत्या साईट्स वरून पाहता येईल
ReplyDeletehttps://freesearchigrservice.maharashtra.gov.in/
Deleteयेथ जाऊन गट नंबर , गावचे नाव कोणत्या वर्षी व्यवहार झाले ते वर्ष इ माहिती भरून बगता येईल
माझ्या आजोबांनी चुलत्याचा मुलाच्या नावावर एका जमीनेचे बक्षिसपत्र केले आहे तर ते कसे रद्द करता येईल??
ReplyDeleteआजोबांच्या उतरत्या वयाचया मानसिकतेचा आणि माझे वडील वारले नंतर ३-४ महिन्या मध्ये या परस्तीतीचा फायदा घेऊन चुलत्याने घडवून आणले आहे
Sir tumchya kakanchya malani gift deed karun ghetle tya case samandhi Kay results laga sanga please same taklip majhyasobat pan ghadli ahe
Deleteरद्द करता येते
Deleteकसे रदद करता येते सर
Deleteif brother of my grandfather gifts me agricultural land
ReplyDeleteis it leviable for stamp duty @ 3% or lumpsum 200 duty is leviable becoz brother of grandfather is also my granfather
Nice आर्टिकल
ReplyDeleteसर आम्हाला आजोबांकडुन गिफ्टडिड करायचे आहे , 6 नातु आहेत , दस्तनोंदणी अधिकारी यासंबंधी क्षेत्र कमी आहे असे कारण देऊन ते सगळ्यांना कसे देता येईल असे विचारतायेत ,
ReplyDeleteतसेच जागेचा सरकारी दर 2 कोटी 80 लाखाच्या दरम्यान आहे त्यामुळे 2 लाख 80 हजार भरावे लागतील असे सांगत आहेत , हे बरोबर आहे का त्याविषयी माहिती मिळाली तर बरं होईल
हो भरावे लागतील
Deleteसर, मी माझा NA प्लॉट दोन चुलत्यांच्या नावावर
Deleteविनामोबदला बक्षिसपत्र करून दिलेला आहे. आता तो परत मला मिळेल का????
Mazya aai chya vadilani bakshis patrakaar karun dile nond pan zali bank lon kadhale 2 year zale ata te rautun magat ahe t
ReplyDeleteसर वरील बांधकामाचे बक्षीस पत्र करता येईल काय
ReplyDeleteSir, mazy problem ashi ahe maze shet he mala mazya vivahit mulichya navavr dyayche ahe but,tya madhe nominat maze mul ahet ... Mazya marna nantr tya madhe tila hissa milel Ka? Pzz .. reply sir.
ReplyDeletesir
ReplyDeletemazya ajobani aplya 4 mulana 1988 la 20 ekar jamin 5 - 5 ekar sarwana sarkhi lihun dili .
mazya mother la kahich nahi dili .
teva ata mazi mother manje tya 4 hi bhawachi bahin .... hila hissa midu sakte ka.. karan te kahi kart nahi...mazya mother la hissa pahije teva midu sakel ka ..upay sanga
पावर आफ अटरनी घेऊन ब क्षिस.घेणारा व देणारा अशी
ReplyDeleteदोघांची सही फक्त घेणारा करु शकतो का
नाही वेगवेगळे दोन व्यक्ती असावे लागतात
Deleteमाझ्या आजोबांनी चुलत्याचा मुलाच्या नावावर एका जमीनेचे बक्षिसपत्र केले आहे तर ते कसे रद्द करता येईल??
ReplyDeleteSir tumchya kakanchya malani gift deed karun ghetle tya case samandhi Kay results laga sanga please same taklip majhyasobat pan ghadli ahe
Deleteदिवाणी कोर्टात अर्ज करा किंवा प्रांताधिकारी यायचे कडे अपील करा
Deletesir mazya aajoba chya nave sheti asun urvrit sheti mazya 2 mama la navi dileli ahe. ani ajoba chi sheti hi mazya aai chya nave kayachi ahe tr process ky kravi
ReplyDeleteजर बहिणीने प्रेमापोटी भावाला आपला हक्क सोडला... आणि भावाचे निधन झाले तर बहीण परत आपला हक्क सांगू शकते का.. त्यासाठी काय करावे लागेल
ReplyDeleteसर बक्षीस पत्र किती रुपयांत होतो,मला १०००० रु सांगितले........
ReplyDeleteसर मला माझ्या वडिलां कडून बक्षीस पत्र करून घ्यायचे आहे मी तहसील मध्ये गेलो तर मला तिथे खर्च16000 हजार सांगितला बरोबर आहे का
Deleteखर्च खूप कमी आहे 1% स्टॅम्प ड्युटी आहे तुम्ही दुय्यम निबंधक कार्यालयात स्वतः जाऊन दस्त नोंदणी करून घ्या . जर तुम्ही दलाल / स्टॅम्प व्हेंडेर याचे कडे गेला तर जास्तच खर्च होईल
Deleteसर बक्षिस पत्र तयार करताना वयाचे काही बंधन असते का
ReplyDeleteनाही
Deletedonner Age limit 78 k?
Deleteसर मी संकेत मुंबईकर (नातू) आणि माझे आजोबा रघुनाथ मुंबईकर
ReplyDeleteमाझे आजोबाना माझ्या नावी बक्षीस पत्र करायचा आहे पण आम्हाला खूप पैसे लागतील असे सांगितले गेले वकीला कडून
आणि जी जमिनी चा बक्षीस पत्र करायचा आहे ती शेतीची जमीन आहे
खर्च खूप कमी आहे 1% स्टॅम्प ड्युटी आहे तुम्ही दुय्यम निबंधक कार्यालयात स्वतः जाऊन दस्त नोंदणी करून घ्या . जर तुम्ही दलाल / स्टॅम्प व्हेंडेर याचे कडे गेला तर जास्तच खर्च होईल
DeleteSir mazya vadilacha flat mazya mulachya navavar gift mhanun karaycha aahe mala stamp duty kity lagel
Deleteसर आमच्या पणजोबा पासूनची जमीन आहे ती आजोबांकडे आली आजोबांनी आजीच्या नावाने केली पण माज्या वडिलांनी आजी कडून बक्षीस पत्र करून घेतली तर माज्या आईचा माजा आणि बहिणीचा वारसा हक्क चालतो का ?
ReplyDeleteसर वडिलांनी मुलाच्या नावाने बक्षीस पत्र केले तर चालतका...
ReplyDeleteहो कमी खर्चात होईल फक्त 1% स्तंल ड्युटी लागते
Deleteसर माझा आजी मयत असून तुझ्या मालकीची जागा मला माझ्या वडीलांनी बक्षीसपत्र केली परंतु आता त्यानी सावत्र आई चा ऐकून त्या विरोधात सिटी सर्वे मधे तक्रार केली आहे तर आता मला प्रोप्रटीकाडला नाव लागेल का
ReplyDeleteMaze husband expire zalyanantr mala v mazya mulila hissa milu Naye mhanun mazya Sasu sasre yani maze putne yanchya nave bakshish patr Kele aahe te cancel krta yeil ka? Kiva Kay karave lagel..
ReplyDeleteMaze husband expire zalyanantr mala v mazya mulila hissa milu Naye mhanun mazya Sasu sasre yani maze putne yanchya nave bakshish patr Kele aahe te cancel krta yeil ka? Kiva Kay karave lagel..
Deleteजमिनीचे बक्षीस पत्र जर केले तर पुढे भविष्यात खरीदी विक्रीस अडचण येते का?
ReplyDeleteदोन मुले असताना आई एकाच मुलांच्या मुलांच्या(नातवाच्या)नावे शेतजमीन बक्षीस पत्राद्वारे करु शकते का
ReplyDeleteAamchya vadilanchya nava varun aamchya navar jamin kashi karvi vadil jiwant aaheye tyache age 65 years aaheye tyanchya samtine jamin navar karaychi aaheye
ReplyDeleteपंजोबाची जमिन अजोबाला सुनेला बक्षीस देता येते का. वाटणीपत्र नसताना ?
ReplyDeleteसर... नमस्कार.. माझ्या वडिलांनी माझ्या सावत्र आईच्या नावाने वडिलोपार्जित शेतीचे बक्षीसपत्र करून दिले आहे... आम्ही तीन बहीण भाऊ आहोत, वडील मयत आहेत, बक्षिसपत्र रद्द होऊ शकते का ? कृपया मार्गदर्शन करा..
हो रद्द होऊ शकते
Deleteजमीन वडिलोपार्जित नसेल तर
Deleteमाझ्या आजोबांनी शेती 1950 साली विकली होती व काही कुळ कायद्यात गेली होती. त्यानंतर कोणीही शेती घेतली नाही वा केली पण नाही. तर आजोबांच्या नातवाला 2020 साली शेती घेता येते का?
ReplyDeleteAns
Deleteमाझ्या आजोबांची वडीलोपार्जित जमिन आहे. ते हयात आहेत. त्यांना ३ मुले आणि २ मुली आहेत. माझे वडील वारले आहेत. माझ्या छोट्या चुलत्याने 'आमचा नाव जमिनीवर चढून देणार नाही' अशी धमकी दिले. आजोबांनी पण हिच धमकी दिले. अस होऊ शकत का? कृपया मला मदत करा.
ReplyDeletepriyalpatil25@gmail.com हा माझा मेल आहे
दिवाणी न्यायालयात वाटणीपत्रासाठी दावा दाखल करा व ७/१२ पत्रकी lis pendncy दाखल करा
Deleteसर,
Deleteदोन वर्षांपूर्वी माझ्या आजीच्या नावावर असलेली शेतजमीन माझ्या काकांनी स्वतःच्या नावावर वारसा करून घेतली व परस्पर गावातील एक पुढारी ला विकली आम्हाला काहीच कळवले सुद्धा नाही ,काका मुंबईत असतात जमीन आम्हीच शेती करायचो पण अचानक दोन वर्षांपूर्वी दुसरे लोकं शेतात येऊन मशागतीची काम चालू केली, आम्ही विचारले असता आम्ही ती जमीन विकत घेतल्याचं सांगितले, तलाठ्याकडे चौकशी केली 7/12 उतारे काढून पाहिले पण ती जमीन त्यांच्या नावावर लागली आहे,
आम्हाला काही करता येईल का जेणेकरून ती खरेदी रद्द होऊन जमीन परत आजी च्या नावावर होईल, माझे वडील अशिक्षित असल्याने त्यांनी पण खाते फोडून घ्यायला अंगठा दिला होता.
आता काही होऊ शकत का की परत आजीच्या नावावर जमीन होईल, आजीचे वय 80 पर्यँत आहे त्यामुळे त्याची समरणशक्ती पण कमी होत आहे, आजी आमच्याकडे च राहते.
कृपया रिप्लाय द्या
सर,
Deleteदोन वर्षांपूर्वी माझ्या आजीच्या नावावर असलेली शेतजमीन माझ्या काकांनी स्वतःच्या नावावर वारसा करून घेतली व परस्पर गावातील एक पुढारी ला विकली आम्हाला काहीच कळवले सुद्धा नाही ,काका मुंबईत असतात जमीन आम्हीच शेती करायचो पण अचानक दोन वर्षांपूर्वी दुसरे लोकं शेतात येऊन मशागतीची काम चालू केली, आम्ही विचारले असता आम्ही ती जमीन विकत घेतल्याचं सांगितले, तलाठ्याकडे चौकशी केली 7/12 उतारे काढून पाहिले पण ती जमीन त्यांच्या नावावर लागली आहे,
आम्हाला काही करता येईल का जेणेकरून ती खरेदी रद्द होऊन जमीन परत आजी च्या नावावर होईल, माझे वडील अशिक्षित असल्याने त्यांनी पण खाते फोडून घ्यायला अंगठा दिला होता.
आता काही होऊ शकत का की परत आजीच्या नावावर जमीन होईल, आजीचे वय 80 पर्यँत आहे त्यामुळे त्याची समरणशक्ती पण कमी होत आहे, आजी आमच्याकडे च राहते.
कृपया रिप्लाय द्या
उत्तर द्या
Deleteसर मी वडिलांच्या एकूण क्षेत्र ० हे १३.६८ पैकी ० हे ०६.६८ इतके बक्षिसपत्र केले आहे.सदरच्या दस्ता नुसार त्याची ७/१२ पत्रकी नोंद होते का ? तुकडा पडतो असे तलाठी यांचे मत आहे.
ReplyDeleteतलाठी ने तो दस्त नोंदवला पाहिजे फेरफार धरला की तो पंधरा दिवसानी मंडळ अधिकारी यांचे कडे ऑनलाईन जातो तो मजूर करायचा किंवा नाही ते मंडळ अधिकारी ठरवतात . तुकडा पडतो की नाही हे तलाठी ठरवू शकत नाहीत. जर तलाठी फेरफार धरायला वेळ लावत असतील तर जिल्हाधिकारी यांचे कडे तक्रार करावी
Deleteनमस्ते सर,
ReplyDeleteब्लॉग खूप चांगला होता. माझा एक प्रश्न आहे कृपया उत्तर दिलात तर मदत होईल,
मुलीच्या आईच्या नावावर जमीन आहे आणि ती जमीन आईच्या वडिलांनी आणि आईच्या चुलत्यानी मिळून आई अपंग आहे म्हणून आईला बक्षीस पत्राद्वारे दिली आहे.
आता येथे मुलगी एकुलती एक आहे आणि मुलीला वडील नाहीत आई भोळी असल्यामुळे मुलगी काहीही करू शकत नाही.
तर येथे मुलीचे मामा म्हणजेच आईचे भाऊ आणि चुलत भाऊ ही जमीन trnasfer करुन ते स्वतः च्या नावावर करू शकतात का?
किंवा येथे ते आजून काही करू शकतात का? आणि याला काही उपाय आहे का?
सर नमस्कार आपला ब्लॉग अतिशय उपयुक्त आहे.मला एका प्रश्नांचे उत्तर हवे होते.... आजोबांनी नातवाच्या नावाने 7 वर्षा अगोदर शेत जमिनीचे बक्षीस पत्र लिहून दिले आहे.नातू आज 15 वर्षाचा असून अपक आजोबा स्वतः आहेत. आजोबांचा एकुलता एक मुलगा अपघातात मृत्यू झाला आहे.. आता आजोबा मुलींच्या सांगण्यावरून बक्षीस पत्र रद्द करतो म्हणतात..तसे करता येते का व तसे झाल्यास काय करावे.. कृपया मार्गदर्शन करावे ही.विनंती...
ReplyDeleteवडिलांकडून बक्षिसपत्राने मिळालेली जमीन नंतर ईतर कोणला विकता येते का ?
ReplyDeleteमुलाला वडिलांकडून बक्षिसपत्राने मिळालेली जमीन मुलगा नंतर ईतर कोणला विकु शकतो का ? का ?
ReplyDeleteबक्षीस पत्र कोणालाही करता येते का कोणतेही नाते नसताना.
ReplyDeleteसर लहान भाऊ मोठ्या भावाला बक्षीस पत्र करून देऊ शकतो काय?
ReplyDeleteSir can I make gift dead with spiritual community? And if yes then can I put conditions ?
ReplyDeleteसर माझ्या आईने 2009 मध्ये माझ्या मामाच्या नावे हक्क सोड पत्र करून दिले आहे शेती ही वडिलोपार्जित होती तर आता मला शेतीमध्ये हिस्सा मिळेल का ? त्यासाठी काय करावे लागेल plz
ReplyDeleteसर, माझ्या बहिणी च्या सासऱ्या कडे 12 एकर होती ते मेल्यानंतर त्यांच्या दोनी पोरांनी 8 एकर विकून टाकली आणि सगळे पसे मित्रात आणि दारूत उडून टाकले त्यामुळे आम्ही त्यांच्या आई आणि माझ्या दाजी च्या नावावरची उरलेली जमिनीचे बक्षीस पत्र केले. आता ते परत जमीन विकन्या साठी कोर्ट मध्ये जाऊ राहिलेत. त्यांनी जमीन नाही घेतली पाहिजे या वर आम्ही काय केले पाहिजे
ReplyDeleteमला ५ चुलते आहेत . माझ्या वाटेला ३ ऐकर जमीन येते ती मला माझ्या पप्पाच्या नावावर करायची आहे .तर ती जमीन बक्षीस पत्राने पाप्पाच्या नावावर होईल का.. आणि किती खर्च येईल.
ReplyDeleteSir maze vadilanchya nave plot ahe te ata old zale ahe to plot Aai chya nave kasa karata yenar
ReplyDeleteBakshhish patr radh kase karave
ReplyDeleteदावा चालू असताना वडिलोपार्जित जमिनीचे बक्षीस पत्र करता येते का?
ReplyDeleteसर वडिलोपार्जित जमीन बक्षीस पत्र करता येते का
ReplyDeleteदोन मुले हयात असताना आजोबांकडून आलेली सर्व मालमत्ता बक्षीस पत्राने वडील एकाच मुलाच्या नांवे करू शकतात का ?
Deleteआजोबांनी चुलते आजारी होते त्यासाठी पैश्याची गरजे साठी काही कारणांमुळे शेत कराराने दिली ,ती जमीन आम्हाला सोडवता येईल का?कारण आता आमच्याकडे जमीन नसल्याने आम्ही मजुरी करतोय. काही उपाययोजना असेल तर प्लिज प्लिज सांगा सर
ReplyDeleteमी पत्नीला घटस्फोट देण्यासाठी माझ्या वडिलांची जमीन मुलाच्या आणि बायकोच्या नावाने बक्षीसपत्र करून देऊ शकतो का, म्हणजे माझे वडील सुनेला आणि नातूला घटस्फोट च्या बदल्यात बक्षीसपत्र देऊ शकता का?
ReplyDeleteमाझ्या वडिलांच्या आणि आत्या या दोघांच्या नावावर 110आर क्षेत्र आहे. परंतु आत्याच्या मुलांने 55.55 क्षेञ बक्षीसपात्रने त्याच्या नावावर केले आहे. ते योग्य आहे की अयोग्य या विषयावर माहिती द्या. बक्षीसपात्र रद्द करण्याविषयी माहिती सांगा.
ReplyDeleteसर बक्षीस पत्र रद्द करता येते परंतु मित्राने मित्राला बक्षीस दिलेले आहे ते रद्द करणेचे आहे पण त्याला मुद्रांक व नोंदणी फी किती लागेल
ReplyDeleteसर बक्षीस पत्र रद्द करता येते परंतु मित्राने मित्राला बक्षीस दिलेले आहे ते रद्द करणेचे आहे पण त्याला मुद्रांक व नोंदणी फी किती लागेल
ReplyDeleteमला माझ्या आईकडून मोकळा प्लॉट बक्षीस पत्राद्वारे माझ्या नावावर करायचा असेल तर किती खर्च येऊ शकतो
ReplyDeleteNice very helpful 👌😊
ReplyDeleteमुलीने वडीलाकडून विकत जागा घेतली आहे त्या ठिकाणी गेले १० वर्ष राहते पण भावानी ती जागा आता वडिलांना न सांगता स्वतःच्या नावावर केली आहे तर घेतलेली जागा कशी नावावर करता येईल.
ReplyDeleteकु .का .क.43 प्राप्त. जमीन मालकास कोणी वारस नसेल तर ती बक्षीस पत्र होऊ शकत का ? आणि समाजातलं नसेल तर. तो मालक होऊशकतो का?
ReplyDeleteमाझ्या साल्याची बायको आदिवासी आहे तिच्या नावावर आदिवासी जागा घेतली आणि बक्षीस म्हणून भाच्या ला देऊ शकते का..........please reply me manoj.nivdunge@gmail.com
ReplyDeleteघरकुल योजनेतून 1977 ला मिळालेले घर खरेदी किंवा बक्षीस पत्राद्वारे घेता येते का?
ReplyDeleteघरकुल योजनेतून 1977 ला मिळालेले घर खरेदी किंवा बक्षीस पत्राद्वारे घेता येते का?
ReplyDeleteघरकुल योजनेतून 1977 ला मिळालेले घर खरेदी किंवा बक्षीस पत्राद्वारे घेता येते का?
ReplyDeleteBlood Rilesion sodun apan dusra kontya hi vyakti la bakshish patra deu shakto ka n mrutyu patrat tya badal nond karu shakto ka
ReplyDeleteबक्षीस पत्र रद्द कसे करावे...
ReplyDeleteसर आज्जा आज्जी यांची 2 मुली आहेत त्यांचे लग्न झाले आहे आज्जा मागील महिन्यामध्ये expire झालेत आता फक्त आज्जी आहे तर ती आज्जी 2 नंबर च्या मुलीच्या मुलग्याला म्हणजे नातू ला सगळी प्रॉपर्टी नावावर करणार आहे पण पहिल्या मुलीची सहमती नाही तर आज्जीला नातू च्या नावावर प्रॉपर्टी करता येते का किंवा बक्षीस पत्र करता येते का
ReplyDeleteमला बक्षीस पत्र करताना शेतीचे बक्षीस पत्र करताना 18000 रुपये खर्च आला तो कसा काय
ReplyDeleteMazya aii chya navane gharache bakshis patara ahe tr te navavar karayala ky karave lagel ani kiti kharach yeil
ReplyDeleteशुभ सकाळ
ReplyDeleteसर,
ReplyDeleteमाझ्या आजोबानी सगळी प्रॉपर्टी मोठ्या चुलत्यांच्या नावावर बक्षीस पात्र केली आहे आणि आता ७/१२ वर माझे बाकीचे चुलते आनंद आत्या व मोठ्या चुलत्याच्या मुलाची आणेवारी नाव आहेत. मोठा चुलत वारला आहे व मोठ्या चुलत्याचा मुलगा आम्हाला ती जमीन वाटून देत नाही व आम्हाला जमीन विकायची आहे तर तो चर्चा करायला येत नाही व मी कोणाला जमीन देणार नाही असं म्हणत आहे. त्यावर काही तोडगा सांगा.
सर, माझ्या वडिलांच्या एका गटामध्ये जमीन नावावर आहे पण ती जमीन
ReplyDeleteकसण्यासाठी नाहि पण तेथील जमीन दुसऱ्या गटामध्ये काढून दिली आहे पण ती नावावर नाही पण त्या जमिनीची वहीत करीत आहे तर ती जमीन कशी नावावर करावी
सर, माझ्या वडिलांच्या एका गटामध्ये जमीन नावावर आहे पण ती जमीन
ReplyDeleteकसण्यासाठी नाहि पण तेथील जमीन दुसऱ्या गटामध्ये काढून दिली आहे पण ती नावावर नाही पण त्या जमिनीची वहीत करीत आहे तर ती जमीन कशी नावावर करावी
सर माझा भाऊ णे घर माझा नवावर बक्षिश पञ करुन दिले पन आता तो भाऊ
ReplyDeleteकाय झाले मेजर
Deleteआम्ही 10 दिवसांपूर्वी आमच्या काकीला बक्षिसपत्राने जमीन दिली परंतु त्याची अजून 7/12 वर नोंद नाही झाली तर ते बक्षीसपत्र आम्ही रद्द करू शकतो का नोंद व्हायच्या आधी???
ReplyDeleteकृपया मार्गदर्शन करावे
सर, वडिलांनी ऐका मुलास सहन प्लॉट किंवा /घरा चे बक्षीस पत्र करून दिल्यास इतर मुले ऑब्जेक्शन घेऊ शकतात का त्यांची संमती लागते का
ReplyDeleteसर मला दोन गुठे जागा एकून 47गुंठे असलेल्या उताऱ्यातून घ्यायची आहे. जमीनीचा तुकडा पडत नाही . जागा आदिवासी आहे.मी पण आदिवासी आहे.जागा बिनशेती व तहसील येणे पण करता येत नाही त्या साठी 99 वर्षांचा करार करावा की दोन गुंठे जागेचे बक्षीसपत्र करावे .कोणते उत्तम व चांगले आहे? कृपया मार्गदर्शन करावे.
ReplyDeleteमाझ्या चुलत बहिणी (मोठ्या काकांच्या मुली )माझ्यासह सहहिस्सेदार आहेत . त्या मला हक्कसोड विनामोबदला करून देऊ शकतात का २०० कि ५०० रुपये मुद्रांक शुल्क मध्ये ....? व आत्याच्या मुली पण सहहिस्सेदार त्यांचा हक्कसोड माझ्या पक्षात करू शकतात का ? किंवा बक्षिसपत्रास पात्र ठरेल का ?
ReplyDeletemazya mamane 4 varas astana ajobankadun gift deed karun ghetli ahe but ajoba ata deth zalet baki varasanna milel ka ata te ghar
ReplyDeleteJar ekhadya plot war laon asel tari pan Bakshipatra krta yeil ka.. Jar kelyas he valid ourawa rahil ka...
ReplyDeleteTotal kiti kharch yeto...
Sir mla vadilachya navavaril 3 ekar Jamin mazya navachi ghyachi aahe, bakshish patradvare tri kiti kharch yeyil
ReplyDeletePlz replie me
माझ्या आजोबांना बक्षीस ब्रिटिश सरकार च्या आदेशावरून सरकार कडून मिळाले ली शेत जमीन आजोबांनीच १९४२ ला विकली . त्याचा विक्री कागद आम्हाला मिळाला आहे. त्यावर सर्व्हे नंबर आहे पण गट नंबर नाहीये. सर्व्हे नंबर वरून गट नंबर काढता येईल का? व वारसा हक्काने आम्ही सरकार व सध्या च्या ताबेदारा विरुद्ध दावा लाऊ शकतो का? कृपया कळवा. आपला कृपाभिलाषी सोहम मुळीक..
ReplyDeleteआमच्या चुलत अॅपाजिंचा 1 पोल्ट आहे तो मला द्यायला तयार आहे पण प्लॉट च्या शेजारी व्यक्ती खूप भांडखोर आहे आणि तहसील व कोर्ट जवळच आहे आपाजी मानतात कोणतीही कागदावर सही करण्यास तयार आहे पण ते घरी मनजेच खेड्या वर आन काय करायचं आणि खर्च किती सांगा
ReplyDeleteसर
ReplyDeleteमी एका खाजगी कंपनीमध्ये २१ वर्षे काम करीत आहे, कंपनीच्या मालकांनी मला त्यांच्या मालकीचा फ्लॅट गिफ्ट द्यायचं ठरविले आहे, फ्लॅट ५ वर्षे जुना आहे, तरी गिफ्ट दीड करता येईल का, आणि मुद्रांक शुल्क किती लागेल, आणि इतर खर्च काय येईल.
सर
ReplyDeleteमी एका खाजगी कंपनीमध्ये २१ वर्षे काम करीत आहे, कंपनीच्या मालकांनी मला त्यांच्या मालकीचा फ्लॅट गिफ्ट द्यायचं ठरविले आहे, फ्लॅट ५ वर्षे जुना आहे, तरी गिफ्ट दीड करता येईल का, आणि मुद्रांक शुल्क किती लागेल, आणि इतर खर्च काय येईल.
Sir Bakshish Patra kelya nanter. Nagarpalika la nav lavnyasati 1% fee sarkari niymanusar bharavi ch lagte ka..ka fakt kharedi parta la tevdach 1 % bharav lagte
ReplyDeleteSir majhe ajoba yani shetiche mrutyu patr navane Karun dile ahe pan tya madhe pudhe majhi atya varas lagel ka
ReplyDeleteमुलगा आपल्या वडिलांना बक्षीसपत्राने जमीन, घर देऊ शकतो का ?
ReplyDeleteमी आमच्या चुलत चुलत्याची वर्ग 2ची जमीन विकत घेतली आहे पन खरेदी करण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. पण भावकितील लोकांसाठी परवानगी लागते का...ही जमीन बक्षीस पत्राने घेता येईल का तलाठ्याच्या म्हणण्यानुसार परवानगी घेणे आवश्यक आहे काय करावे
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteSir plz call me 7038958263
ReplyDeleteजर वडिलांच्या सातबारा मध्ये त्यांच्या मुलींऐवजी दुसऱ्याच व्यक्तिची नावे असतील, तर ती काढून टाकण्यासाठी काय करावे?
ReplyDeleteवडील जिवंत आहेत पण आजीला जमीन नातवाच्या नावे बक्षीस पत्र करायचे आहे .
ReplyDeleteपुढे वडील काही आव्हान निर्माण करू शकतात का ?
माझ्या वडीलांनी स्वकष्टाने मिळवलेली जमिण ,मला बक्षीस पत्र करून दिली , ती जमिण मी इतर कोणालाही बक्षीस देऊ शकतो का ..
ReplyDeleteपुतण्या कडुन काका ला बक्षीस पत्र करता येते का
ReplyDeleteमाझ्या वडील मला त्यांनी स्वतः बांधलेल्या घरचे बक्षीस प करून देण्यास तयार आहे. परंतु मी रजिस्ट्रार ऑफिस ला जाऊन चौकशी केली असता मला सांगण्यात आले की अर्धा टक्का स्टॅम्प duty तुम्हाला भरावी लागेल.
ReplyDelete200 रुपया chya stamp dutyvar बक्षिसपत्र करण्याची मुदत फक्त 31 डिसेंबर 2020 पर्यंत होती. हे योग्य आहे काय.
सर वडिलोपार्जित जमीन बक्षीस पत्र करता येते का आनी चुलत भावार्थ करून घेतले आहे आमहाला हिसा मिल का
ReplyDeleteमी पुणे मांजरी इथे आईच्या नावाने 1 गुंठा जमीन घेऊन घर बांधले ।। जमीन घेण्यापासून ते घर बांधन्या पर्यंत मी खर्च केला आहे। आता ती जमीन माझ्या नावावर करायची आहे। तर मला किती खर्च येईल।
ReplyDeleteरक्ताच्या नात्याला म्हणजे मुलाला जमीन बक्षीस पत्र करून दिली असेल तर नगर पंचायत ल त्याची नोंद लावण्यासाठी किती खर्च अपेक्षित आहे ? आमची नगर पंचायत विना मोबदला बक्षीस पत्रासाठी बाजार मूल्याप्रमाणे त्या मुल्याच्या 2% रक्कम आकारत आहे, हे योग्य आहे का ?
ReplyDeleteAmachya Relative ne 1982 sali bakshis patraddware 7 Guntha jaga ghetali hoti Thyache dust sudha (Nond )keli nahi Atta ti nonda karnata Talatine Bakshish jamanichi nonda karnata yet nahi ahe sangitale .(Jamin ghetalelya vyaktichi hi kahi harakat nahi)
ReplyDeleteKay kele pahije
Amachya Relative ne 1982 sali bakshis patraddware 7 Guntha jaga ghetali hoti Thyache dust sudha (Nond )Keli ahe.
ReplyDeleteAtta ti nonda karnata Talatine Bakshish jamanichi nonda karnata yet nahi ahe sangitale .(Jamin ghetalelya vyaktichi hi kahi harakat nahi)
Kay kele pahije
Bakshis patr kelelya property varti loan hou shakte ki nahi ??
ReplyDeleteJar mala maji property majya mulila gift karavayachi asel tar tya madhe tila tya property varti loan wagere milu shakte ki nahi ?
माझ्या बहिणीच्या नवऱ्याने तिला फसवून स्वतःचा चुलत बहिणीचे बरोबर लग्न केले.व त्या मुलीच्या नावे gift deed केले आहे असा मला संशय आहे. माझ्या बहिणीने काय करावे
ReplyDeleteSir kotwal dunga che dusrya vyaktila bakshispatra karun deta yeil ka aani 7/12 madhe te nav kenwa chadhel.
ReplyDeleteआमचे आजोबा हयात असताना त्यांना ४-५ गुंठे जमीन घर बांधण्यासाठी दिली होती . गेली 50 ते 70 वर्षांपासून तिथे आमचे घर आहे. त्यावेळी जमीन घेतल्यावर कुठलाही कागदी व्यवहार झाला नाही. आता आमाला ती जमीन आमच्या नावावर (बक्षीस पात्र द्वारे )करून घ्यायची आहे. आणि ह्यासाठी जमीन देणाऱे हरकत घेत आहेत. तरी अश्याप्रकारे बक्षिस पत्राद्वारे जमीन नावावर करून घेण्याची प्रोसेस कशी आहे
ReplyDeleteसर, माझा पुण्यात 1 bhk फ्लॅट आहे, मी owner आणि वडील co onwer आहेत, तर मला फ्लॅट विकायचा आहे पण वडिलांशी 5 ते 6 वर्ष बोलणे बंद आहे, तर उपाय सुचवा...हक्क सोड पत्र,गिफ्ट डीड का आजून कुठला पर्याय वापरावा..
ReplyDeleteSir bakshish patra vadiloparjit jaminiche hote ka
ReplyDeletehello sir, mi shree.. maze ajoba sheshraoji ashikshit ahet. dolyani barobar dist nahi. tyancha mulga mhanjech maze wadil maran pawle ahet. amche sangpan aai ne kele.
ReplyDeletemudda asa ahe ki, ajoba atya kade gele asta, mazya atyebhawani nuksan bharpayicha form bharanyakrita jayche sangun ajobana tahsil ofice la gheun gele. ani registered bakshispatra karwun ghetle. nantar he prakaran amhala patwari kadun milalelya notice dware kalale.
bakshiptrachi duyyamprat kadhun ajobana vachun dakhwili. tewa ajoba ani amchya lkshat he prakaran ale. ajoba mhanale, mala ya madhe lihilelya majkur baddal kunich kahi sangitle nahi kiwa vicharle mahi. ase mla mahiti aste mi tya wr angatha kela nasta. mla he bakshisptra manya nahi. bakshisptrache ferfar vhayche ahe tyaadhi ya prakaranawar ajobani akshep nondwila ahe. ajoba (doner) hayat ahet. tr he bakshispatra cacle hou shkate kay? kiwa tyawar kahi suggetion sangawe..
hello sir, mi shree.. maze ajoba sheshraoji ashikshit ahet. dolyani barobar dist nahi. tyancha mulga mhanjech maze wadil maran pawle ahet. amche sangpan aai ne kele.
ReplyDeletemudda asa ahe ki, ajoba atya kade gele asta, mazya atyebhawani nuksan bharpayicha form bharanyakrita jayche sangun ajobana tahsil ofice la gheun gele. ani registered bakshispatra karwun ghetle. nantar he prakaran amhala patwari kadun milalelya notice dware kalale.
bakshiptrachi duyyamprat kadhun ajobana vachun dakhwili. tewa ajoba ani amchya lkshat he prakaran ale. ajoba mhanale, mala ya madhe lihilelya majkur baddal kunich kahi sangitle nahi kiwa vicharle mahi. ase mla mahiti aste mi tya wr angatha kela nasta. mla he bakshisptra manya nahi. bakshisptrache ferfar vhayche ahe tyaadhi ya prakaranawar ajobani akshep nondwila ahe. ajoba (doner) hayat ahet. tr he bakshispatra cacle hou shkate kay? kiwa tyawar kahi suggetion sangawe..
Sar . Gharche bakshish patra notri kel ahe .tar atta mala te rgistar karayche ahe .maza abaji maran pavle ahe tar mala notri kelel bakshish patar rgistr kata yeto ka
ReplyDeleteHello sir
ReplyDeleteMi akshata deo mjhya vadilachya nantr tyanchya property var varsa hakka mhanun to mla Milne ahe but mjhya vadilache bhau mi mulgi ahe asa vichar karun to mla n milanchya praytnat ahet ashya veli mi Kay karave
maze bakshish patr kele aahe pn chultyane harkat arj dila aslyamule ajun city serve madhe nond zali nahiye tyala mi kay kru shakto.
ReplyDeleteBakshish patra madhe कोणत्या तिसर्या व्यक्तीचा हिस्सा padu शकतो का?
ReplyDeleteमी स्वतः शेत जमीन खरेदी केली आहे परंतु मला ती शेती आता मला मुलांच्या नावावर न करता मला माझ्या बहिणीच्या नावावर करायची योग्य मार्गदर्शन व्हावे
ReplyDeleteआजोबांना वडिलोपार्जित जागा मिळाली आहे आजोबा मामा मावशी ह्यात आहेत, आजोबा बक्षीस पत्र करू शकतात का? वाटण्या झाल्या नाहीत अजून
ReplyDeleteसर वाटपपत्रा साठी 2012 पासुन कोर्टात दावा चालु आहे या दरम्यान मृत्युपत्र किंवा बक्षिसपत्र होऊ शकते का ? जाहल्यास काय करावे
ReplyDeleteकृपाय मार्गदर्शन करावे
नमस्कार सर
ReplyDeleteमी सचिन महाराज धर्माधिकारी
हिंगोली जिल्ह्यात ग्रामीण भागात मी 5 गुंठे जमीन (शेतजमीन) विकत घेतली
मात्र धूर्त काही लोकांनी ती दानपत्र
करून दीली. मला व्यवहारांच विषेश ज्ञान नसल्याने मी दानपत्रावर सही केली.
दुसरी विषेश गोष्ट म्हणजे त्या प्राॅपर्टीवर एक ट्रस्ट आहे ज्यामध्ये 9 सदस्य आहेत.
सदर जागेचा पुर्ण मोबदला मी दिला आहे पण तसे लेखी लिहून घेतले नाही. तेव्हा माझी अशी ईच्छा आहे की ही मिळकत माझ्या नावे होऊन त्याची विक्री करता यावी. कायद्यानुसार एखादी तरतूद असेल तर कृपया योग्य मार्गदर्शन करावे.
कळावे
सचिन महाराज
नमस्कार साहेब मी शिरीष विष्णूपंत माने माझे आईवडील दोघेही नोकरदार सर्व संपत्ती स्वकष्टार्जित चौघे भाऊ. आईवडील दोघेही वारले. एक भाऊ त्याचा हिस्सा मला बक्षीस पत्र करून देऊ इच्छित आहे.काय करावं लागेल?
ReplyDeleteनमस्कार सर
ReplyDeleteमाझे वडील माझ्या नावावर राहत असलेला रूम नावावर करत आहे , पण अजून आमचे हिस्से झाले नाही
मी आणि माझी अजून बहीण आहे .पण काही कारणस्थ वडील राहता रूम माझ्या नावावर करत आहे..आज आम्ही चोकशी केली तर रूम रजिस्टर होत नाही बोलत आहे, स्लम एरिया आहे म्हणून असे काही असते का
सर आपणास सैनिकाचा नमस्कार,
ReplyDeleteमाझे वडिलांनी निवृत्त झालेनंतर ५ गुंठे जागा आपले नावावरती घेतली होती. सदर जागेवर मी व माझा लहान भाऊ यांनी सर्व पैसे खर्च करून घर बांधले आहे, सदर घर बाधतेवेळी वडील व मोठा भाऊ यांचेकडे कोणताही बँक बॅलन्स व income source नव्हता. आज माझे वडिलांचे वय ७६ वर्षे आहे व ते गेली दोन वर्षांपासून अंध/दृष्टिहीन (दिसत नाहीत) आहेत. माझा मोठा भाऊ यांनी मी, आई व लहान भाऊ यांना गावगुंडगिरी करून सदर घरातून डिसेंबर २०२० मध्ये बाहेर काढले आहे. आता कळाले आहे कि, मोठा भाऊ याने फेब्रुवारी २०२१ मध्ये वडिलांकडून आपले मुलगा वय वर्षे १३ याचे नावे सदरची ५ गुंठे जागा बक्षीस पत्र विना मोबदला (दस्त करून) करून घेतली आहे व ७/१२ व ८अ ला मुलग्याचे नाव व आपण स्वतः अपाक अशी नोंद झाली आहे.
मला खालील प्रश्नांची कृपा करून उत्तरे दया:-
१. अंध/दृष्टिहीन वयस्क व्यक्तीस बक्षीस पत्र करताना कोणता कायदा व नियम आहे.
२. दस्त नोंदणीवेळी वडील व भावाचा मुलगा याच्याकडे पॅन कार्ड नाही, सदर अनिवार्य आहे का?
३. अंध/दृष्टिहीन वयस्क व्यक्तीस बक्षीस पत्राचा दस्त नोंदणी करताना कोणती कागदपत्रे/दाखले सादर करणे अनिवार्य आहे यांची सविस्तर माहिती द्यावी तसेच कागदपत्रे/दाखलेबाबत कायदा/GR / परिपत्रक असलेस त्याची माहिती द्यावी.
४. वडिलांवरती दबाव टाकून बक्षीस पत्र करून घेतले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर बक्षीस पत्र रद्ध करता येते का व कोणाकडे तक्रार करावी.
५. सदर ५ गुंठे जागेच्या ७/१२ उतारावरती इतर अधिकार मध्ये तुकडे बंदी तुकडे जोड कायदा विरुद्ध व्यवहार अशी अगोदर व आजही नोंद आहे.
६. सदर जागेचा फेरफार मार्च २०२१ रोजी झाला आहे तो रद्ध करता येतो का?
७. याबद्धल अधिक माहिती असलेस ती पण कृपा करून कळवावी.
माझा E -Mail dhananjaymore1973 @gmail .com
बक्षिस पत्र केल्यावर
ReplyDeleteसदर जमीन doni la दुसऱ्या ल विकता येते की बकशिस पत्र्च करावे लागते.....
माझा पण हाच प्रश्न आहे
Deleteनमस्कार साहेब मी शिरीष विष्णूपंत माने आपला फोन वर परिचय झाला आहे. आम्हा चौघा भावांना आईने केलेल्या मृत्यू पत्राचे प्रोबेट मिळाले आहे. एक भाऊ त्याचा हिस्सा मला बक्षीस पत्र करून देऊ इच्छित आहे .घरजागा व शेती. काय करावे लागेल?
ReplyDeleteबक्षीस पत्राने मिळालेली जमिन लाभार्थी विकु शकतो का
ReplyDeleteVihir transfer karayachi she ti cheat katya cha navavar ahe
ReplyDeleteI liked article written by Advocate which provides knowledge in brief.
ReplyDeleteArticle is self explanatory
Could I get contact number and E mail of Advocate Rohit Erande.
Dr.D.A.Sarnaik, mobile 9516638435
E mail- dr.d.a.sarnaik@gmail.com
एखाद्याची बायको असताना तो आपल्या वडिलोपार्जित संपत्तीद्वारे मिळालेल्या कमर्शियल प्रॉपर्टी चे आपल्या भावाच्या नावे बक्षिसपत्र करू शकतो का?
ReplyDeleteSir mazya mothya vadilala tyanch ghar tyanchya 2 bhau manje baba ani kaka sobat ashya tighan maddhe vatp kraych ahe tr Kay karav lagel lockdown maddhe
ReplyDeleteवडिलोपार्जित 5 एकर जमीन आहे,वडिलांच्या नावावर.
ReplyDeleteआई-वडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे.
मी मोठा मुलगा असून कामानिमित्त बाहेरगावी आहे. वडिलांनी मला काहीही न कळवता परस्पर 3 एकरांचे बक्षिसपत्रं लहान भावाच्या नावाने केले आहे,परंतु ही गोष्ट मला समजल्यावर मी तलाठी यांना सदर गोष्ट कळवली. तलाठी यांनी मला बायहॅन्ड नोटीस बजावली आहे. मी रीतसर हरकत असल्याबाबत तलाठी यांना अर्ज केला आहे!
मग,मी आता पुढे काय करू?
सदरचे बक्षिसपत्रं रद्द होऊ शकेल काय?
भाऊ आणि वडिलांवर कायदेशीर कारवाई करता येईल काय? त्यांनी बक्षिसपत्रं मागे नाही घेतलं तर पुढे मी काय कार्यवाही करू?
मोबाईल-9226110851
संभाजी गिडगे.
Same question
Deleteसाहेब जर महाराष्ट्रात भावा कडून सख्या बहिणीला स्वतःच्या मालकीची शेती मालमत्ता बक्षीस पत्र करुन द्यायची असेल तर स्टॅम्प ड्यूटी लागेल का आणि किती लागेल
ReplyDeleteसर आमच्या आजोबांचे नावं सातबर्यामध्ये नाही आहे , पण आजोबांच्या इतर भावांचे नावे आहेत परंतु गेली 50 वर्ष ती जमीन आम्ही कसत आहोत तर ती जमीन आता माझ्या वडिलांच्या नावे कश्याप्रकारे करता येईल ??
ReplyDeleteकृपया मार्गदर्शन करावे.
सर, बक्षीस पत्र रजिस्ट्रेशन करताना डोनी आणि डोनर दोघांना रजिस्ट्रेशन ऑफिस मध्ये जावे लागते का ? जर डोनर आजरी असल्याने अंथरुणावर असल्याने येऊ शकत नसेल तर अशा वेळी काय करता येईल ? एक वकिलांनी अस सल्ला दिला की त्यांची सही घेऊन, साक्षीदार यांची सही होईल मग ते नोटरी कडून सही घेऊन तुम्ही रजिस्ट्रेशन ऑफिस मध्ये एकट्या जाऊ शकता. पण हे किती बरोबर ए माहीत नाही 2,3 वकील वेगवेगळ्या प्रकारे माहिती देत आहेत. कृपया कायदा काय आहे हे सांगा
ReplyDeleteबक्षिस पत्र केल्या नंतर.घर दुसऱ्याला विकता येते का?
ReplyDeleteSir
ReplyDeleteमाझ्या आजीची 3 एकर जमीन गाव वाहेगांव तालुका परतूर जिल्हा जालना येथे आहे तरी मला त्याचे बक्षिसपत्र करावयाचे आहे त्यासाठी स्टॅम्प ड्युटी किती लागेल व लोकल बोडी टॅक्स किती असेल कृपया मार्गदर्शन करावे धन्यवाद 🙏
ReplyDeleteSir mazi Jamin majya baykochya navavar Karachi ahe Kay krave kami krchat
ReplyDeleteEither she can purchase it from you or you make a Gift in her favour so that she can become immediately else you can make a WIll, but will operates after your Death
Deleteमृत्युपत्रावर वकिलाची सही असण्याची काहीच गरज नाही. कमीत कमी २ साक्षीदार असणे गरजेचे आहे. त्याच बरोबर डॉक्टर सर्टिफिकेट असणे प्रॅक्टिकली आवश्यक आहे. धन्यवाद
ReplyDeleteनमस्ते सर
ReplyDeleteसख्ख्या चूलत भावाने करून दिलेले
50 हजार रूपये पेक्षा जास्त किमतीच्या
स्थावर मिळकतीचे बक्षीसपत्र करमुक्त असते कि करपात्र असते.
Please consult a Chartered Accountant for this question,
DeleteSir mala majhya pappancha flat majhya नावावर करायचा आहे तरी काय करावे
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
DeleteEither you purchase from him or ask your father to make a Gift deed so that you can become immediately else he can make a Will, but will operates after the death of your Father.
Deleteसर माझ्या भावाचे व त्याचे पत्नीचे नावे फ्लँट आहे सदरचा फ्लँट हा त्याचे स्वकमाईतुन त्यानी घेतला आहे . आता भावाला त्याचा वाटणीचा फ्लँट हा मला बक्षीस पञा द्वारे मा्झ्या नावे करायचा आहे तर त्या करीता स्टँम्प ड्युटी भरावी लागेल का
ReplyDeleteसर म्हाडा ची जागा विकत घेता येते का आणि विकत घेताना कशी काळजी घ्यावी
ReplyDelete20 वर्ष वीटभट्टी मध्ये माज्या नवऱ्याने काम करून सासरे यांनी ती जमीन मुलींना बक्षीस पत्र करून दिली व माज्या नवऱ्याला काहीच देत नाहीत.. आता आम्हाला जमिनिमधून बाहेर काढलाय.. तर काय करता येईल?? क्रुपया मार्गदर्शन करावे
ReplyDeleteसर. नमस्कार आम्ही शेत वस्तीवर राहतो वीस वर्षांपूर्वी वैयक्तिक आमच्या शेतीपैकी दोन गुंठे जमीन शेत वस्ती शाळेसाठी दान दिली होती.परंतु भविष्यात तेथे शाळेचे बांधकाम सुरू झाले. व थोडे बांधकाम झाल्यानंतर बांधकाम बंद झाले. त्यानंतर पाच वर्षांनी दुसऱ्यांच्या शेतीच्या जागेवर शाळेची बांधकाम करण्यात आले.व आमच्या शेतीतील शाळेची जागा तशीच पडून आहे. तर आम्ही त्या दोन गुंठे जागा परत मिळेल का ❓ बक्षीस पत्र वगैरे झालेली नाही जागा अजून आमच्या सातबार्यावर आहे. आपण मार्गदर्शन करावे.
ReplyDeleteसर बिनशेती 3गुंठे प्लॉट मधील 1600 sqft असणारे घर आरसीसी विकत घेता येते का ? Reply द्या sutar933@gmail.com
ReplyDeletePlease mail me Gift Deed format in Marathi (Father to Son)
ReplyDeletemhatresg13@yahoo.com
बक्षिसपत्र साठी परवानगी कोणाची घ्यावी लागते का?
ReplyDeleteनमस्कार सर मी राजकुमार परीट इंचनाळ,ता-गडहिंग्लज,जिल्हा-कोल्हापूर, माझ्या वडिलांच्या नावाने त्यांच्या आजोबांनी बक्षीसपत्र केलं आहे ते सापडत नाहीये ते मिळवायचं एडेल तर त्याची नक्कल कुठे मिळेल कृपया मार्गदर्शन करावे
ReplyDeleteSir.... mazya sasu chya aai kdun aamhi rahtya gharache बक्षिसपत्र करत आहोत...तर या बक्षिसपत्र मध्ये mazya sasu che aani maze nav lavu shkto ka
ReplyDeleteकाकाकडून पुतण्यालाबक्षीस पत्र करण्यासाठी स्टॅम्प ड्युटी किती लागेल
ReplyDeleteशेत जमिनीचे बक्षीस पत्र केले तर किती दिवस वैध असते. की बक्षिसंपत्र करून देणारा वारला तर बक्षिसंपत्र अपोआप रद्द होते का?
ReplyDeleteबक्षिस पत्राद्वारे दोघांना हक्क देऊन दोन नावे लावता येतात का
ReplyDeleteSir good Afternoon mazya Shetila Lagun Mazya chulat bhau and bahin chi 2 Acer sheti Aahe 7/12 var daith zalelya 5 Aatya Che Nave Aahe tar mala Jivit Aslelya chulat bhau bahin yanchya Kadun shetiche bakshish Patra (giftdeed) karta yetil ka Sir, kay karave Lagel
ReplyDeleteHi
ReplyDeleteमाझा आजीचे 4 मुले आणि 1 मुलगी आहे.
आमचं जमिनीत आजोबा वारल्या वर
आजी, 4 मुले आणि 1 मुली आणेवारी लागल्या आहे.
आता आजी ने बक्षीस पत्र करून मोठ्या मुलांचं नात्वावचा नाव वर तिचा हिस्सा करून दिला आणि ती आता वारली तिचे वय 78 होते. तर मोठ्या मुलाला 2 हिसे भेटणार आणि बाकीच्यांना 1 1 हिस्सा भेटणार.
मोठ्या मुलांनी बक्षीस पत्र बाकीच्या मुलांना न सागता केलं आहे . तर ते रद्द होऊ शकत का? Pls suggest
Article is useful. I need email ID of Advocate Rohit Erande, mobile 9960759244, mail vkkondawar@gmail.com
ReplyDeleteसर...माझ्या माझ्या आजोबांना 4 भाऊ होते...ज्या वेळी आजोबांचे वडील मयत झाले तेव्हा सर्व जमिनीचे अधिकार आजोबांच्या मोठ्या भावाला मिळाले, व नंतर बरीच वर्ष त्यांनी ती जमीन खेडून खाल्ली,4 भाऊ हिस्सा मागायला गेले असता त्यांनी विरोध केला,नंतर आजोबांना या कारणाने high कोर्टात कैफियत दाखल केली व आपला हिस्सा मिळवला, व आपल्या दोन भावांना ही त्यांचा हिस्सा मिळवून दिला..1965 साल..कोर्टात खूप पैसा खर्च झाला त्या खर्च पोटी ज्या दोन भावांना हिस्सा मिळवून दिला त्यांनी त्यांच्या हिस्साचा जमिनी आजोबांच्या नावाने बक्षिसपत्र करून दिले....7/12 आजोबांच्या नावाने झाला आहे.आता त्या जमिनी त्या दोन भावांचे मुल मागणी करत आहेत... सर पुढचं कस कराव....plz काही तरी सुचवा..
ReplyDeleteसर गेली २५ वर्ष आई वडिलांना मी सांभाळत होतो .आणि माझे ३ भाऊ आहेत ते आता २ भाऊ हीस्सा मागत आहे पण मला आईने मृत्यू पत्र बनून दिला आहे रूम आईच्या नावे आहे ती sra ने. १० वर्ष नावावार होत नाही त्यामध्ये ते कोर्ट मधे गेले तर मृत्यू पात्राचा काही उपयोग होऊ शकतो का कारण गिफ्ट डीड बनवायच्या अगोदर आई मृत्यू पावली आहे
ReplyDelete