हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©
हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. :
ऍड. रोहित एरंडे. ©
"नावावर जागा करणे" किंवा "७/१२ वा प्रॉपर्टी कार्डला नाव लावणे" या बाबतीत अनेक लोकांमध्ये गैरसमज दिसून येतात. बहुसंख्य लोकांना असे वाटत असते की, ७/१२ च्या उताऱ्याला किंवा प्रॉपर्टी कार्डला नाव लागले की आपले नाव लागले की आपण मालक झालो आणि नाव गेले कि आपला मालकी हक्क गेला. वस्तूथिती मात्र उलटी आहे. अश्या उताऱ्यांनी मालकी हक्क ठरत नाही.
आपल्याकडे एखाद्या मिळकतीमध्ये मालकी हक्क हा कुठल्याही २ किंवा अधिक व्यक्तींच्या हयातीमध्ये खरेदीखत, बक्षीसपत्र, हक्कसोड पत्र, वाटप-पत्र यांसारख्या नोंदणीकृत दस्तानेच तबदील केला जाऊ शकतो. हे दस्त कायद्याने नोंदविणे गरजेचे आहे आणि त्यावर योग्य ते मुद्रांक शुल्क म्हणजेच स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी शुल्क भरणे गरजेचे असते. त्याचप्रकारे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर मिळकतीमधील मालकी हक्क हा मृत्यूपत्राने किंवा वारसा हक्काने तबदील होऊ शकतो.
ह्या दस्तांमधील "हक्कसोड पत्र" किंवा ज्याला इंग्रजीमध्ये "रिलीज डीड" म्हणतात ह्या प्रकारची आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करू.
ह्या दस्ताच्या नावावरूनच आपल्या लक्षात आले असेल की हक्क सोडण्यासाठी मिळकतीमध्ये हक्क असणे अभिप्रेत आहे. जेव्हा २ किंवा अधिक व्यक्तींना एकाच मिळकतीमध्ये हक्क असतो आणि त्यामधील कुठल्याही एका सहमालकाला त्याचा/तिचा हिस्सा हा अन्य सहमालकाच्या लाभामध्ये सोडून द्यायचा असेल, तेव्हा हक्क सोड पत्र दस्त बऱ्याच वेळा केला जातो. हक्कसोड पत्राला बरेचवेळा बहीण-भावाचा दस्त असे समजले जाते. कारण बहुतांशी वेळा बहिणींचा वडीलोपार्जित मिळकतींमधील हक्क भावांच्या लाभात सोडण्यासाठी ह्या दस्ताचा वापर केला जातो.
हक्कसोड पत्र आणि स्टॅम्प ड्युटी :
जेव्हा एखाद्या व्यक्तीला वडिलोपार्जित मिळकतीमधील आपला हिस्सा स्वतःच्या भावाच्या किंवा बहिणीच्या किंवा मुलगा/मुलगी ह्यांच्या लाभात किंवा जेव्हा मुलगा/मुलगी मयत असतील तर त्यांच्या मुला मुलींच्या म्हणजेच नातवंडांच्या लाभात किंवा स्वतःच्या आई किंवा वडिलांच्या किंवा वैवाहिक जोडीदाराच्या लाभात , पण कुठल्याही प्रकारचा मोबदला न स्वीकारता सोडून द्यायचा असेल, तर फक्त २०० रुपयांच्या स्टॅम्प ड्युटी वर हक्क सोड पत्र नोंदणीकृत करता येते. ह्या नाममात्र स्टॅम्पड्युटीसाठी वडिलोपार्जित मिळकत आणि विना-मोबदला ह्या दोन महत्वाच्या अटींची एकाचवेळी पूर्तता होणे आवश्यक आहे. इतर सर्व प्रकारच्या हक्क सोड पत्रासाठी मात्र खरेदीखतासारखीच संपूर्ण स्टॅम्प-ड्युटी भरावी लागते.
वडीलोपार्जित मिळकत आणि स्वतंत्र/स्वकष्टार्जित मिळकत म्हणजे काय ह्याचा आपल्याकडे बऱ्याचवेळा गोंधळ दिसून येतो. वडिलोपार्जित मिळकत हि संकल्पनाच हळूहळू संपत चालली आहे, हे मा. सर्वोच्च न्यायालयाने देखील मान्य केले आहे. मात्र एखाद्या व्यक्तीची स्वतंत्र/स्वकष्टार्जित मिळकत हि कायम स्वतंत्रच राहते आणि तिच्या पुढच्या पिढीकडे ती मिळकत वडिलोपार्जित म्हणून जात नाही, असे निकाल १९८६-८७ सालापासून मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. बरेच वेळा मिळकत स्वतंत्र का वडिलोपार्जित अणि स्टॅम्पड्युटी ह्यावरून वाद-विवाद होतात.
अश्यावेळी बक्षीस-पत्राचा तुलनेने कमी स्टॅम्प-ड्युटी लागू होणारा किंवा कुठलीच स्टॅम्पड्युटी न लागणार मृत्यूपत्रासारखा दस्त करणे श्रेयस्कर असते.
हक्क-सोड पत्राचा उपयोग :
हक्क-सोड पत्र नोंदणीकृत करून दिल्यावर दस्त लिहून देणाऱ्या व्यक्तीचा त्या मिळकतीमधील हक्क संपुष्टात येतो आणि लिहून -घेणाऱ्या व्यक्तीचा त्या मिळकतीमधील मालकी हिस्सा त्या प्रमाणात वाढतो.
हक्क सोडपत्र हा एक महत्वाचा दस्तऐवज आहे. हा दस्त करण्यामागे देखील दस्त करणाऱ्या पक्षकारांची परस्परांबद्दलची आपुलकी अभिप्रेत असते. कधी कधी हक्क-सोड पत्रामागे "सोड-हक्क" अशी भावना असल्याचेही दिसून येते. असो.
ऍड. रोहित एरंडे
पुणे. ©
पुणे. ©
एक प्रश्न विचारततो
ReplyDeleteपुर्वीच्या काळी बहिण तलाठी कार्यालयात नुसता लेखी अर्ज करायची आणि त्या अर्जा मध्ये नमूद करायची की मि सदर मिळकती मधून हक्क सोडला. हि गोष्ट कायदेशीर आहे का.
Haq sod patra cha namuna milel ka,.
Deleteसर आम्ही तिघे जण भाऊ आहे आणि साहा बहिणी आहेत आणि आमच्या तिघा भाऊच काही जमत नाही पण या दोघी वडिलांच्या पाठीमागे जी जमीन त्यांना मिळणार आहे तर त्या जमीनच हक्क सोड पत्र करून देतात तर मी एकटा खाते फोड करून घेवू शकतो का
Deleteनाही, खातेफोड करणेसाठी सर्वजण लागतील
Deleteनमस्कार आमच्या वडिलांना आमच्या आत्या हिस्सा मागत आहेत आणि ते लोक आम्हाला खूप त्रास देत आहेत सर त्यामधील 2 आत्यांनी हक्कसोड पत्र दिले आहे। आणि 3 आत्या मागत आहेत. आता जमिनीत वहिवाट आमची आहे. ऊस असतो पण ते लोक ऊस तोड आली की आडवे येतात म कसातरी ऊस घालवला करखानायला की मग कारखान्यावर जाऊन बिल अडवतात सोडू नका म्हणून सांगतात.
ReplyDeleteम या सर्व गोष्टीला वैतागून आम्ही कोर्टात गेलो आणि आम्हीच त्यांना वाटून जावं म्हणून दावा टाकला
मग आमचे वकील म्हंटले की तुला बिल काढून देतो कारखान्यातील तर अजून काही नाही काढून दिले.
त्यांनी सातबऱ्यावरील एकत्र कुटुंब मॅनेजर पण काढून टाकले जे माझे वडील होते
मला आपली मदत हवी आहे की त्यांना किती जमीन वाटून जाईल कोर्टाकडून
This comment has been removed by the author.
DeleteThis comment has been removed by the author.
DeleteYou also try to make your release deed online. download the format or fill the form and make your release deed online;
ReplyDeleteसर माझ्या आईने 2009 मध्ये माझ्या मामाच्या नावे हक्कसोड पत्र केले आहे शेती वडीलो पार्जित होती आता मला शेतीमध्ये हिस्सा मिळेल का? कसा plz
ReplyDeleteBalaji solnar
Deleteमाझ्या आई नी २०१६ सालि हक्क सोड प्रमाणपत्रावर सही केली होती .पण माझ्या शैक्षणिक कमा साठी आता अम्हाला शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र लागत आहे जे हक्क सोड केल्यामुळे मिळत नाही.परत थोडी फार जमीन मिळण्या साठी काय करावे?
ReplyDeleteएखाद्या जमिनीवर जर सामायिक हिस्सेदार जर जमिनमालक नसतील संरक्षित कुळ असतील तर त्यांना सदर जमीन 32 ग अन्वये खरेदी केली नसताना सुद्धा एका विशिष्ट सामायिक हिस्सेदार असलेल्या कुळास त्याच्या लाभात जमीन हस्तांतर करता येते का?
ReplyDeleteजमीन 32 ग ने आपण खरेदी केली नसली आणि आपण जमीन मालक नसलो तरी आपल्यासाठी एकमेकांच्या लाभात हक्क सोड पत्र कसे करता येईल?
सर मी माझ्या भावाला हक्क सोडपत्र दिल आहे आणि माझी कागदोपत्री पुर्तता न केल्यामुळे मी त्यावर हरकत घेतली आहे व भुमि अभिलेखने माझा हरकत अर्ज फेटाळला आहे तर मी पुढे काय अपिल करू शकतो का
ReplyDeleteसर मला जागेमालकाने जान्यायेन्या करीता आपल्या मालकी हक्काच्या जागेतुन ५ फुट जागा सोडली आहे असे लेखी दिले आहे तर त्या जागेवर माझा हक्क भेटु शकतो का
ReplyDeleteप्लीज मला कळेल का
Deleteमाझ्या चुलत बहिणी (मोठ्या काकांच्या मुली )माझ्यासह सहहिस्सेदार आहेत . त्या मला हक्कसोड विनामोबदला करून देऊ शकतात का २०० कि ५०० रुपये मुद्रांक शुल्क मध्ये ....? व आत्याच्या मुली पण सहहिस्सेदार त्यांचा हक्कसोड माझ्या पक्षात करू शकतात का ?
ReplyDeleteHak sod patra natevaik naslelya pan yekach city sevey no. V tyavar ektrit malki aslelya vaktichya nave karta yete ka
ReplyDeleteHeyy..
ReplyDeleteMy father is investing in the ancestral property for developing it.
But know his sister are taking action on it do they have right..
After my grandfather's death there names were added to 7/12 and after the year there names were taken out from 7/12 in 1990..so after the death of grandmother again there name can be added or not???
And according to paper work there is no names added in 7/12 ..
So on this source after grannies death
Can they have any appeal as granny has died in 1996
Please answer me ....
This comment has been removed by the author.
ReplyDeleteबिल्कीस बंदूकवाला वि शहनाझ बंदूकवाला केसलॉ( दि,12/10/2010)
ReplyDeleteसर मुली हक्क कधी मिळतात वडिल जीवंत असतान की मृत्यू नंतर , हक्क घेण्यासाठी काय करावे लागेल
ReplyDeleteवडिलांनी मुलीच्या नावावर गिप्ट डिड तयार करून नोंदणीकृत केलेलीअहे पण मुलगी सदर गिप्ट डिड ऐवजी हक्कसोड पत्र लिहून देत असल्यास आशा हक्कसोड पत्राचे नोंदणीकृत करण्यासाठी मुद्रांक शुक्ल भरावे लागते किंवा गिप्ट डिड कॅन्सल करण्यासाठी त्या मालमत्तेचे पुन्हा मुद्रांक शुल्क भरावे लागते का
ReplyDeleteHakkasod zalyavar kiti divsani 7/12 varil nave kami hotat
ReplyDeleteHakkasodpatra kuthlya pan tahesil la karta yete ki jya gavchi jamin ahe tithech karave lagte?
ReplyDeleteआजोबा ह्यात आहेत,मामा 3 बहिणी पैकी दोघींचे हक्क सोड पत्र घेऊ इच्छित आहे,राहिलेली बहीण हक्क/वाटणी मागत आहे? वाटणी मिळेल का की कोर्टात केस करावी लागेल
ReplyDeletehakk sod patr 5 bahininch vegvegal karata yet ka.....
ReplyDeleteआमच्या वडिलांच्या बहिणीचं सातबारा आठ नाव आहे तिचा आता मृत्यू झाला आहे तिचे सातबारा मधून नाव काढण्यासाठी तिच्या मुलांकडून हक्क सोड पत्र करून वडिलांच्या बहिणीचा सातबारा मधून नाव काढू शकतो का
ReplyDeleteअध्यान व्यक्ति(१८ वर्षे कमी असलेली) हक्क सोड करू शकत नाही, तसेच त्याला अ. पा. क.म्हणून दुसरी व्यक्ति हक्क सोड करू शकते का?
ReplyDeleteसर वडीलांच्या अगोदर मुलीचा मृत्यू झालेला
ReplyDeleteआहेत मुलीच्या मृत्यूस 40 वर्ष झालेली आहे वडील मृत्यू झाल्यानंतर त्या मुलीच्या वारसदार यांची नोंद केली नाहीत वडीलांच्या मृत्यूस आत्ता 20 वर्ष झालेली आहेत
आत्ता मुलीच्या वारसदार यांची वारसदार म्हणून नोंद करता येईल का ?
सर, माझ्या आत्याने रजिस्ट्री ऑफिस मधून हक्कासोड पत्र करून दिलेलं आहे . माझ्या आत्या आता हिस्सा मागत आहेत त्यांना न्यायालयातून हिस्सा मिळेल का
ReplyDeleteRipley
Deleteसर माझा घटस्फोट होत आहे पण आमचे घर हे पतीपत्नी दोघांच्या नावाने आहे आता तीचे म्हणने आहे की घर मुलाच्या नावाने करा त्याचे वकील म्हणतात की वारसा हक्क रजिस्टार ऑफीस मधून करून मग घटस्फोट होइल वारसा हक्क दिला तर मला माझ्या ईतर मालमत्ते मध्ये मुलाचा हक्क नको मला सांगा वारसा हक्क कसा करायचा please Sagetion you
ReplyDeleteसर एकदा हक्क सोड झालेला आहे म्हणजे दोन भाऊ व एक बहीण या पैकी बहीनीने यापुर्वीच हक्क सोड केलेला आहे , आणि नंतर दोन भावांपैकी एक जण हक्क सोड देवू शकतो का ?
ReplyDeleteसर नमस्कार माझा मामांनी मला फसवलेजमिन तेच्या नावावर हक्क सोडपत्र केले आहे तर माझी केंस सरकलकडे चालू होते तेच्या निकाल मामाच्या बाजूने निकाल दिला आहे तर मी आत्ता काय करावे मी एक अपंग व्यक्तींती आहे सर मला मदत करावी हि विनंती करतो धन्यांवाद
ReplyDeleteसर माझ्या आजी चे नाव तिच्या 2 भावाच्या 7/12 मध्ये होते तेव्हा मी माझी आजी मयत झाली तेव्हा मी त्यांच्या वारस लावले आता त्या वारसांना मारण्याची धमकी देऊन हक्क सोडपत्र द्यायला सांगतात
ReplyDeleteसर यावर उपाय काय आहे सर प्लिज सांगा
ReplyDeleteसर आमचा इथे वारस 7/12 वर चढले आहे आणि आता आत्याचे आणि आजीचे हक्क सोडायचा आहे आणि मोठे बाबा आणि माझे वडील यांचा मध्ये जमीन नावि व्हायची आहे
ReplyDeleteजमीन आमचा सहमतीने वाटप झाली आहे फक्त 7/12 चढवायची राहिले आहे
जावई आणि सासरे यांची कम्बाईन मिळकत असेल तर सासरे हक्कसोड करू शकतात का?
ReplyDeleteमाझ्या आईला प्राधिकरणामध्ये घर मिळाले आहे कायदेशीर 99 वर्षाच्या कराराने मिळालेल्या घराचा ताबा घेऊन प्राधिकरणातर्फे झाले आहे आईच्या मृत्यूनंतर सदर जागेवर तिच्या चार मुले आणि तीन मुली यांच्या नावाने माननीय कोर्टाकडून वारसदार म्हणून ऑर्डर मिळाली आहे ऑर्डर मिळाल्यानंतर एका भावाचे निधन झाले आहे त्यामुळे आता उरलेल्या सर्व भाऊ आणि बहिणी लहान भावाच्या नावाने हक्कसोड प्रमाणपत्र द्यावयास तयार आहेत प्रश्न एवढाच आहे की वारसदार म्हणून मिळालेल्या कोटाच्या ऑर्डर नंतर ज्या भावाचा मृत्यू झाला आहे त्यांच्या दोन मुलींची हक्कसोड प्रमाणपत्र चे संबंध आहे का त्यांच्याकडून हक्क सोड पत्र घेणे बंद आहे का याविषयी कृपया माहिती द्यावी.
ReplyDeleteपतीने पत्नीला न विचारता म्हणजे नोटीस नबजावता हक्कसोड दिली तर पत्नी किंवा तीचे नातेवाईक हरकत घेऊ शकतात का
ReplyDeleteमुलींनी वडीलांच्या संपत्तीत हक्क सोड केला आहे तरी आईच्या संपत्तीत मुलींना हिस्सा मिळेल का
ReplyDeleteआम्ही तिघे भाऊ आहोत. मला हक्क सोडायचा आहे पण मी सोडलेला हक्क माझ्या एकाच भावाला देऊ शकतो का? म्हणजे मी हक्क सोडून माझा हिस्सा फक्त माझ्या मोठ्या भावाला देऊ शकतो का? म्हणजे कोणा एका व्यक्तीच्या नावे आपण हक्क सोड करू शकतो का?
ReplyDeleteसर समायिक क्षेत्राचे हक्क सोड पत्र होऊ शकत का?
ReplyDeleteसर सामायिक क्षेत्रात हक्कसोड पत्र होऊ शकत काय
ReplyDeleteमाझ्या चुलत भावाचे वडील खूप वर्षे झाले बेपत्ता आहेत आणि आता आमच्या वडिलोपार्जित जमीन वाटप करताना हक्कसोड पत्र करताना अडचण येत आहे ...कारण वारस नोंदी मध्ये जे आहेत ते सगळे उपस्थित पाहिजे आणि माझं चुलता बेपत्ता आहे काय करावे...कृपया मा्गदर्शन करा...
ReplyDeleteसर मिळकतीवर FLAT मी स्वतः आणि माझी दिवंगत पत्नी यांची नोंद आहे , मला स्वताची एक मुलगी आहे , मी दुसरे लग्न केले आहे , आता माझ्या मुलीसाठी मी माझा संपूर्ण हक्क सोडू इच्छित आहे , कारण हि मिळकत माझी सेल्फ अक्वायर्ड आहे , तर माझी दुसरी पत्नी हि त्या मिळकतीवर कायदेशीर अधिकार दाखवू शकते का, मी आणि मुलगी यांचा ७५% आणि २५% अधिकार आहे , तर मी हक्क सोड पत्र मुलीच्या नावाने 100% करू शकतो का ? आणि या संदर्भात माझ्या दुसऱ्या पत्नीचा संमती घेणे अनिवार्य आहे का ? प्लीज मार्गदर्शन करणे
ReplyDeleteSociety has no Release deed nor Saledeed nor title clear on the basis of conveyance can their name be on property card Release deed is totally written opposite to Conveyance deed can a society claim to be the owner in respect to the Land on which Society structure stands
ReplyDeleteसर आम्ही 4 भाऊ आहोत,1 भाऊ नालासोपारा राहतो ,आणि आम्ही इतर 3 भाऊ एकाच sra bldg मध्ये राहतो, मी वडिलांच्या नावावर असणाऱ्या रूम मध्ये राहतो वडील वारल्यानंतर मी सोसाटीला रूम नावावर करण्यासाठी लेटर लिहिले तेव्हा माझ्या लहान भावाने objection घेतलेले आहे,माझ्याकडे 3 भावांचे नोटरी केलेले हक्कसोड पत्र आहेत,असे असतान रूम माझ्या नावावर करताण काही problum येऊ शकतो का किंवा इतर भाऊ रूम माझ्या नावावर करताना काही अडचणी निर्माण करू शकतात का
ReplyDeleteमोठा भाई ,2 नो भाऊ राहतो ती रूम वडिलांची होती ती त्यांनी त्याच्या नावावर केली त्या बदल्यात त्या 2 भावांनी माझ्या रूम वरील हक्क सोडले तर 3 no भावाला मी पैसे देऊन हक्कसोड पत्र घेतलेले आहे
थोडक्यात 3 भावांचे हक्कसोड पत्र माझ्याकडे असताना मी वडिलांच्या मृत्यूनंतर sra ची रूम माझ्या नावावर करू शकतो ना त्या साठी काय करावे लागेल
,सर अमी 3 ग आहे आई मि न एक बहीण तीच न आई च हाकसोड पात्र करून मज्या नावाव करायचं आहे सगळं काय करावे लागेल डोकमेण्ट काय लागतील न किती खर्च येईल
ReplyDeleteमाझ्या वडिलांची 32 ग ची वडिलोपार्जित जमीन होती , काका च्या मुलाने माझ्या वडिलांकडून हक्कासोड पत्र लिहून घेतला. व ती जमीन स्वतःच्या नावे करून घेतली , ज्या वेळेस हक्कसोड केले त्यावेळेस मी सद्यान होतो , तर मला या जमिनी मध्ये हिस्सा मिळेल का
ReplyDeleteमाझ्या आईने माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर दुसरे लग्न केले आहे. त्यानंतर तिचा माझा काहीच संपर्क नाही. आता माझ्या वडिलोपार्जित जमीनीवर मला वारस नोंद करायची आहे. माझ्याकडे तिचे कोणतेच डॉक्युमेंट्स नाहीत. तिच्या भावाकडे तिच्याविषयी विचारणा केली असता तो तिचा पत्ता वा मोबाईल नंबर काही देत नाही. अशा परिस्थितीत मी वारस नोंद करू शकतो का?
ReplyDeleteसर माझा दोन बहणींनी माझा भावाचा नावाने हक्कसोड पत्र केले आहे असा शक्य आहे का दोघींनी मिळून फक्तं एकाच भावाचा नावाने हक्कासोड करता येणे
ReplyDeleteआणि जर हक्कस्सोड पत्रावर असलेल्या सह्या खोट्या असतील तर भावाला काही शिक्षा होऊ शकते का
ReplyDeleteनमस्कार सर माझ्या मामाने आई आणि मावशी ची दिशाभूल करून हक्कसोड पत्र करून घेतले आहे माझ्या आईचे आणि मावशी ची ७-१२ तसेच फेरफार वरील नाव चुकीचे आहे .... संबंधित विषय न्यायालयात तक्रार केली परंतु ragistration office मध्ये दस्त नोंद असल्याने दावा ना मंजूर करण्यात आला... याविषयी पुढे काय करावे
ReplyDeleteनमस्कार सर माझे वडील वारले. त्यांच्या पश्चात् आई अणि आम्ही दोन मुली आहोत. वडिलांनी फ्लॅट che nomination आई च्या नावे केले आहे. आम्ही आईला provisional membership मिळावी म्हणुन society ला म्हणुन स्टॅम्प पेपरवर no objection सादर केले पुढे सक्सेशन letter देऊ. पण secretary ani काही member आम्हाला (मला आणी माझ्या बहिणीला) realese deed करण्यासाठी फोर्स करत आहेत. ते आम्हाला करायच नाही तर कृपया आम्ही काय करावे सल्ला द्यावा.
ReplyDelete