श्वशुरगृहात विधवा सुनेचे हक्क. ॲड. रोहित एरंडे ©
श्वशुरगृहात विधवा सुनेचे हक्क. ॲड. रोहित एरंडे © माझ्या मित्राचे नुकतेच अचानक निधन झाले. त्याच्या वडिलांची स्वकष्टार्जित भरपूर संपत्ती आहे, परंतु सासू-सासरे आणि त्यांची सून म्हणजेच माझ्या मित्राची बायको यांचे अजिबात पटत नाही, त्यामुळे ती दोन मुलांना घेऊन माहेरी गेली आहे. सासऱ्यांची स्वतःची भरपूर संपत्ती आहे, परंतु ते या सुनेला काहीही देणार नाही असे म्हणतात. सासऱ्यांना अजून १ मुलगा आणि १ मुलगी पण आहेत. तर माझी मित्राची बायको सासऱ्यांच्या मिळकतीवर हक्क सांगू शकते का, त्यासाठी केस करता येईल असा सल्ला काहींनी दिला आहे ? मालकी हक्काबाबत आपल्याकडे अनेक गैरसमज आहेत त्यातील प्रमुख ३ गैरसमज नमूद करणे गरजेचे आहे (१) अनेक लोकांना असे वाटत असते कि वैवाहिक साथीदाराच्या मृत्यूनंतर केवळ उर्वरित जोडीदाराच आपोआप एकटा १००% मालक बनतो; (२) करारात पहिले नाव ज्याचे असते त्याचा हिस्सा किंवा अधिकार हा दुसरे नाव असलेल्यापेक्षा जास्त असतो आणि पहिले नाव असलेली व्यक्ती मयत झाली की आपोआप सर्व हक्क दुसरे नाव असलेल्या व्यक्तीलाच मिळतो आणि (...