साठे खत - खरेदी खत : समज गैरसमज : ॲड. रोहित एरंडे.©
साठे खत - खरेदी खत : समज गैरसमज : ॲड. रोहित एरंडे.© एखाद्या मिळकतीमध्ये मालकी हक्क कसा मिळतो ह्या बाबत आपल्याकडे बरेच गैरसमज दिसून येतात. मा. सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच 'रमेश चंद वि. सुरेश चंद (C.A. क्र. ६३७७/२०२२, निकाल दि. ०१/०९/२०२५) या याचिकेवर निकाल देताना हे स्पष्ट केले की केवळ पॉवर ऑफ ऍटर्नीच्या आधारावर किंवा साठे खताच्या आधारावर जागा विकत घेणाऱ्याला जागेमध्ये मालकी हक्क मिळत नाही, केवळ योग्य स्टँम्प ड्युटी भरलेल्या नोंदणीकृत खरेदीखतानेच जागेमध्ये मालकी हक्क प्राप्त होतो. या लेखाच्या अनुषंगाने या विषयाची थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करू. ७/१२ - प्रॉपर्टी कार्ड यांनी मालकी ठरत नाही. एखाद्या मिळकतीमध्ये मालकी हक्क हा कुठल्याही २ किंवा अधिक व्यक्तींच्या हयातीमध्ये खरेदीखत, बक्षीसपत्र, हक्कसोड पत्र, वाटप-पत्र यांसारख्या नोंदणीकृत दस्तानेच, योग्य ते मुद्रांक शुल्क म्हणजेच स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी शुल्क भरूनच, तबदील केला जाऊ शकतो ह...