सामायिक जागेचा वापर खासगी वापरासाठी नको. ॲड. रोहित एरंडे ©
मी पुण्यातील एका सोसायटीमध्ये शेवटच्या - ७व्या मजल्यावर राहतो. मी माझ्या दरवाजाबाहेरील भिंतीला लागून एक लाकडी कपाट चप्पल ठेवण्यासाठी ठेवले आहे. मात्र माझ्या शेजाऱ्याने यावर हरकत घेऊन सोसायटीकडे तक्रार केली आहे की नियमाप्रमाणे कॉरीडोअर , जिना, इ. कॉमन जागेत अश्या कुठल्याही वस्तू ठेवता येणार नाहीत. बाकी प्रत्येक मजल्यावर काही जणांनी लोखंडी रॅक, कपाटे ठेवली आहेत तर काहींनी चक्क सुरक्षिततेसाठी पॅसेजला दार करून तो आत घेतला आहे. कॉरीडोअरचा असा वापर करणे गुन्हा आहे का ? कायदा काय सांगतो ? एक वाचक, पुणे. तुमच्यासारखे प्रश्न बहुतेक ठिकाणी दिसून येतात, फक्त तक्रारी होण्याचे प्रमाण अत्यल्प असते ! सोसायटी असो वा अपार्टमेंट, सभासदाला जसे काही हक्क प्राप्त होतात त्याचबरोबर त्याला काही कर्तव्ये देखील पार पाडायची असतात आणि दोन्ही ठिकाणी सभासदाला सामायिक (common ) जागेचा वापर खासगी कारणाकरिता करता येत नाही. या आपल्या प्रश्नाचा विचार करिता कायदेशीर तरतुदी आदर्श उपविधी आदर्श उपविधी क्र. १६९ (अ) मध्ये स्पष्ट केल्या आहेत. आपल्याला जेवढी जागा करारनाम्याने...