ॲटॅच्ड टेरेस फ्लॅटसाठी जादाचा मेंटेनन्स नाही. ॲड. रोहित एरंडे ©
ॲटॅच्ड टेरेस फ्लॅटसाठी जादाचा मेंटेनन्स नाही. ॲड. रोहित एरंडे © सोसायटी मधील मेंटेनन्स चार्जेस प्रत्येक सदनिका धारकाला समान असतात असे समजते. त्यामध्ये चटई क्षेत्रानुसार वाढ करता येत नाही. काही सदनिकांना जोडून गच्ची किंवा टेरेस असते किंवा ओपन टू स्काय असा भाग असतो. समजा सोसायटी तील सर्व सदनिका ५०० स्क्वेअर फूट या चटई क्षेत्राच्या आहेत. त्यांचा देखभाल खर्च म्हणून समजा ५००० रुपये सोसायटी चार्ज करते. म्हणजे १० रुपये प्रती फूट. परंतु एक सदनिका अशी आहे की तीचे चटई क्षेत्र २५० फूट कव्हर्ड व २५० फूट ॲप्रूव्हड प्लॅन नुसार ॲटॅच्ड टेरेस, ज्याला त्या सदनिकेमधूनच एन्ट्री आहे, म्हणजे जोडलेली आहे. या वेळी या सदनिकेला सोसायटीने मेंटेनन्स चार्ज किती लावला पाहिजे या बाबत काही नियम आहेत का? वरील उदाहरणात या सदनिकेचा मेंटेनन्स चार्ज फ्लॅटसाठी वेगळा आणि टेरेससाठी वेगळा असला पाहिजे का ? मिलिंद काळे, मुलुंड, मुंबई आपल्या मेंटेनन्सच्या प्रश्नामध्ये टेरेसबद्दलचे उपप्रश्न दडले आहेत. प्रत्येक सोसायटीमध्ये कळीचा मुद्दा असलेला मासिक देखभाल खर्च / से...